दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज चांदूर रेल्वे बंद

0
605
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

जम्मू -काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. या हल्ल्याने देशाला हादरवून सोडले आहे. हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असतांना चांदूर रेल्वे शहरात सुध्दा या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी चांदूर रेल्वे बंद ठेवण्यात येणार आहे.

     यापुर्वी गाडगेबाबा मार्केटमधून कँडल मार्च काढून शहरात श्रध्दांजली वाहण्यात आली होती. यानंतर आता आज सोमवारी सर्व पक्षीय, सामाजीक संघटना , धार्मिक संघटना, व्यापारी संघटनांतर्फे आझाद पुतळ्यापासुन ते जुना मोटार स्टँड पर्यंत निषेध रॅली काढून चांदूर रेल्वे शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

मुस्लीम समुदायातर्फे कँडल मार्च

      अतिरेक्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज सोमवारी मुस्लिम समुदाय व मित्र परिवार तर्फे कँडल मार्चचे आयोजन केले आहे. ही रॅली सायंकाळी ६.३० वाजता सुभाष प्राथमिक शाळेपासुन निघून जूना मोटार स्टँन्डपर्यंत येणार आहे.