विकास की बाते की छोडो, पाकिस्तान को फोडो – मुस्लीम समुदायातर्फे काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये शेकडोंची उपस्थिती

0
1519
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाड  खान) 

     जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चांदूर रेल्वे शहरातील मुस्लीम समुदायातर्फे सोमवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्च काढून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये मुस्लीम समुदायासह सर्व धर्माचे शेकडो नागरीक शामील झाले होते.

     जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लीम भागातील काझीपुरा येथील सुभाष शाळेजवळून सोमवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्च काढण्यात आला. हा मार्च अमरावती रोड, गांधी चौक, सिनेमा चौकातुन भ्रमण करीत जुना मोटार स्टँड येथे पोहचला. या ठिकाणी मेनबत्त्या मोठ्या प्रमाणात पेटविण्यात आल्या. यानंतर कारी साजीद यांनी शहिदांसाठी दुआ पठन करून दोषी आतंकवाद्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. शहरवासीयांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत शहिदांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशेब चुकता करावा,  या घटनेने प्रत्येक भारतीयांचे हृदय हेलावले आहे अशा भावपूर्ण वातावरणात श्रध्दांजली अर्पण केली. यादरम्यान पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, विकास की बाते छोडो पाकिस्तान को फोडो, वीर शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यावेळी अनिस सौदागर, कारी साजीद, सैय्यद जाकीरभाई, मेहमुद हुसैन, बादर खान, वहिद कुरेशी, इसराईल कुरेशी, समिर जानवानी, हमीद कुरैशी, जमील कुरेशी, बक्कु कुरेशी, अब्दुल गफ्फार, सरफराज खान, जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष देवानंद खुणे, प्रदिप वाघ, नगरसेवक सतपाल वरठे, बंटी माकोडे, सुमेध सरदार, गौतम जवंजाळ, संघपाल हरणे, इमरान सौदागर, ताबीश कुरेशी, शहेजाद सौदागर, अजहर हुसैन, साजीद जानवानी, समिर खान, मोहम्मद आसीफ, मोहम्मद जुबेर, शहेजाद खान, मोहम्मद इम्रान, हरिस सौदागर, मोहसीन खान, मोहम्मद दानिश, परवेज मुशरर्फ, शकील कुरैशी, शाकीर कुरैशी, आवेज राजा, मोहम्मद इर्शाद, आफताब काझी, नवाज कुरैशी, युसुफ सौदागर, नदीम सौदागर, आरिष सौदागर, शौएब अख्तर, अमजद पठान, नौशाद पठान, नुरहसन कुरैशी, मोहसीन खान, अशफाक शाह, मुख्तार शाह, मोहम्मद वसीम, फारूख कुरेशी, जमील कुरेशी, सैय्यद कैस, राजीक कुरेशी, अफसर खान, गफ्फार कुरैशी, शेख अकबर, आरिफ खान, शेख शब्बीर, हारूण शाह, असलम कुरेशी यांसह सर्वधर्माच्या शेकडो शहरवासीयांची उपस्थिती होती.