छत्रपतींच्या जयंती दिनी जिजाऊंचाही जल्लोष

124

छत्रपतींच्या जयंती दिनी जिजाऊंचाही जल्लोष

उस्मानाबाद / प्रतिनिधी – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८९ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत असताना उस्मानाबाद येथील प्रेरणा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या जिजाऊंनी मोटार सायकलवर रँली काढुन छत्रपतींच्या जयंतीचा उत्साह साजरा केला.महिलांच्या उन्नतीसाठी प्रेरणा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवीले जात असुन महिलांमध्ये धाडस निर्माण व्हावे यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महिलांची मोटारसायकल राँली काढण्यात आली .प्रथम शहिद विर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली . सौ किरण निंबाळकर अध्यक्ष प्रेरणा बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था यांनी उपस्थीत महिलांना मार्गदर्शन केले यावेळी सौ वैशाली गायकवाड मनसे जिल्हाध्यक्षा यांची प्रमुख उपस्थिती होती. या रँलिमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या व त्यांच्यात उत्साह संचारल्याचे दिसत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या आश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच यापेक्षाही मोठ्या उत्साहात दर वर्षी जयंती साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।