प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना ही चित्ररथाद्वारे सातारा जिल्ह्यात गावागावांत पोहोचवणार – सुदर्शन पाटस्कर .

146

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना ही चित्ररथाद्वारे सातारा जिल्ह्यात गावागावांत पोहोचवणार – सुदर्शन पाटस्कर .

कराड:जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येते प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा जिल्हा मुद्रा बँक अशासकीय सदस्य सुदर्शन पाटस्कर व जिल्हा अग्रणी बँकेचे झोनल मेनेजर
श्री माझीरे साहेब,भाजपा नेते दत्ताजी थोरात,अशासकीय सदस्य संतोष मिसाळ,मुद्रा बँक सचिव श्री जगदाळे साहेब यांच्या प्रमुख उपस्तीथीत पार पडला .

यावेळी सुदर्शन पाटसकर म्हणाले की जिल्ह्यातील तरुण पिढीला बेरोजगारीतून सोडवण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना ही कोणतेही आनुषंगिक तारण आथवा जामीनदार शिवाय होतकरू बेरोजगार तरुणांना कर्ज पुरवठा करून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी मुद्रा योजना सुरू करण्यात आलीआहे.एखादा लहान उद्योग, व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी आडच़ण येते, मुख्य आडच़ण ही भांडवलाची आसते, कोणताही उद्योग व्यवसाय आणि व्यापार उभारायाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मूलभूत गरज आहे, या सर्वचा विचार करून जिल्हयात मुद्रा बँक योजनेविषयी लोकांच्या मनातील शंका दूर करून त्या योजनेचा जास्तीत जास्त तरुण व नवीन उद्योजकांना यांची महिती मिळावी म्हणून फिरत्या चित्ररथद्वारे गावागावात प्रसिध्दी करणार आहे, असे आपल्या मनोगतात सांगितले

या मुद्रा बँक योजना रथयात्रा उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, जयदीप ठुसे, विठ्ठल देशपांडे, उमरफारुख सय्यद, आयसीआय बँकेचे राजगुरू सागर, बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री.बारटक्के, आयडीबीआय बँकेचे सुहास ताम्बेश्वर, युनियन बँकेचे प्रफुल्ल मेटागे, सहायक जि.नियोजन अधिकारी सौ.मोरे, माळी साहेब,यशपाल गवळी साहेब, सूरज जीरगे, अभिजित म्हात्रे आदी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।