उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या गावांना मार्गदर्शन !  सावंगा , बरडपवनी  येथील ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन जाणून घेतल्या उपाय योजना !  वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून नरखेड तालुक्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल   — राजेंद्र भुयार उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

197

उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या गावांना मार्गदर्शन !

सावंगा , बरडपवनी येथील ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन जाणून घेतल्या उपाय योजना !

वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून नरखेड तालुक्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल — राजेंद्र भुयार उपमुख्य कार्यकारी अधिकारी

विशेष प्रतिनिधी /

सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून नरखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली नरखेड तालुक्यातील नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून पूर्ण केली आणि नरखेड तालुक्यातील काही गावे आदर्श ठरली त्या आदर्श गावातील अनेक सामाजिक समस्यांचा आणि गावकऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा जाणून घेतला. दिनांक १८/०२/२०१९ ते १९/०२/२०१९ रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकार राजेंद्र भुयार उपमुख्य कार्यकारी अधिकारी. चेतन हिवंज सहा. गट विकास अधिकारी पंचायत समिती नरखेड , नेहारे विस्तार अधिकारी , पानी फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक भूषण कडू ग्रामसेवक किंकर , इंगळे , बांते , पानी फाउंडेशन चे तालुका समन्वयक हेमंत पिकलमुंडे , रुपेश वाळके , भूषण सूर्यवंशी यांच्यासह समस्त कर्मचारी पदाधिकारी या मंडळींनी रानवाडी , बरडपवनी, तारा, बानोरचंद्र, उदापुर, रामठी, आरंभी, खरसोली या गावामध्ये स्पर्धे आधि २० गुण प्राप्त केले असून या गावातील केलेल्या कामाची पाहणी आणि ग्रामस्थां सोबत चर्चा करून कामाचे नियोजन करण्यात मंडळींनी गावकऱ्यांची मदत केली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी १८ तारखेला अमरावती जिल्ह्यातील सावंगा येथील प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन नरखेड तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच बरड पवनी येथील प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन आर्वी तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यां सोबत हितगुज करून दुसऱ्या दिवशी नरखेड तालुक्यातील गावांना भेटी दिल्या व स्पर्धेमध्ये सुरू असलेल्या गावांची पाहणी करून गावकऱ्यांना मार्गदर्शन केले .

उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी नरखेड तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेमध्ये झालेल्या कामाचा आढावा जाणून घेण्याचा प्रयत्न केला . देशातूनच नाही तर जगभरातून असंख्य लोक टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमांतून पाणी फाउंडेशन सोबत जोडले गेले. त्यानुसार अनेकांनी कामेही सुरू केली होती. अनेक स्तरांवर लोकांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे बदल सुरू झाला, गोष्टी बदलू लागल्या. नरखेड तालुक्यातील झालेल्या कामांमुळे कळत आहे की लोकांना परिवर्तन हवे आहे आणि त्यासाठी त्यांची काम करण्याची देखील इच्छा आहे हे नरखेड तालुक्यातील नागरिकांनी दाखवून दिले आहे .

पाणी ही एक अशी समस्या आहे जी सगळीकडे दिसून येते. गाव असो की शहर, पाण्याची समस्या सर्वत्र सारखीच आहे. येणाऱ्या काही दिवसात काय परिस्थिती असेल याचा विचार देखील करवत नाही. खासकरून गावात, कारण जिथे पाणी नाही तिथे शेती नाही. पाण्या अभावी शेतीतील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो , पाणी टंचाईच्या या जीवघेण्या परिस्थितीला कंटाळून अनेकजण गाव सोडून शहराकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे .

त्यासाठी या सगळ्या गावांनी एकत्र येऊन आपल्या गावांमध्ये अत्यंत कमी खर्चात होणारे जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्राचे काम केले आहे . या कामाचा परिणाम म्हणजे त्यांच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे . या गावांवर पडलेल्या पावसाचा एकही थेंब वाहून जात नाही . पावसाच्या पाण्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने साठवून अडवून ठेवले गेले आहे .

हे काम प्रत्येक गाव, प्रत्येक शहरात करता येण्यासारखे आहे. प्रत्येक गाव हिरवेगार व समृद्ध होऊ शकते कारण हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सोपे, शक्य आणि कमी खर्चात होणारे आहे .

पानी फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ पाण्याच्या संकटाबाबत जनजागृतीच करत नाही तर ट्रेनिंगद्वारे तांत्रिक माहिती देऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे . पाणी फाउंडेशन ला हा विश्वास आहे की पाण्याच्या या संकटावर मात करण्यासाठी लागणारी सगळ्यात मोठी ताकद लोकांच्याच हातात आहे. कारण जिथे जिथे ही समस्या सोडवली गेली तिथे तिथे लोकांच्या मेहनतीमुळे आणि प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले असल्याचे जिवंत उदाहरण नरखेड तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याचाच आढावा घेऊन असा प्रयोग तालुक्यातील सर्वच गावांमध्ये करून नरखेड तालुका दुष्काळ मुक्त करून नरखेड तालुका पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशन मार्फत गावकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून नरखेड तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या ९७ गावामधील नागरिकांचे मनसंधारण होतांना दिसत आहे . या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सावंगा येथील प्रशिक्षण केंद्रावरील पाणी फाउंडेशन ची तज्ञ प्रशिक्षक मंडळी नयन गावंडे , प्रणिता खुजे , शेषराव राठोड , अजय पाचारे , प्रज्वल टापरे , रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , भूषण सूर्यवंशी यांच्यासह आदी प्रशिक्षक मंडळी करीत असून सर्व प्रशिक्षणार्थ्यांची जल संधारणाकडून मन संधारणाकडे वाटचाल होत असल्याचे चित्र नरखेड तालुक्यात दिसत आहे हे विशेष !

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।