*कडेगाव तलावात बंदिस्त पाईप लाईनद्वारे पाणी देणार* *टेंभुचे उन्हाळी आवर्तन सुरु करणार : संजय काका पाटील यांची कडेगाव स्मार्ट सिटी ग्रुपला ग्वाही

0
792
Google search engine
Google search engine

मा. ना. खासदार संजय काका पाटील (उपाध्यक्ष-कृष्णा खोरे विकास महामंडळाचे) यांची भेट तासगाव सरकारी विश्रामगृह येथे भेट घेतली त्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष कडेगांव मा. हिम्मतराव देशमुख बरोबर सामाजिक कार्यकर्ते श्री डी एस देशमुख,महावीर माळी, सुनिल मोहिते (कप्टन), प्रकाश शिंदे, यांचे सह निमसोडचे सरपंच संतोष पवार हजर होते‌कडेगांव तलाव, गायकवाड तलाव (महादेव डोंगर) व शिवाजी नगर जकवेल मधून ९ नंबर दाऱ्यातून बंदिस्त पाइपलाइन द्वारे कडेगांव तलावात पाणी सोडण्याबाबत व हद्द निश्चित बाबत चर्चा करून लेखी पत्र दिले त्यावेळी संजय काकांनी टेंभूचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्याशी फोनवर बोलून लवकरात लवकर आचारसंहितेच्या आधी बंदिस्त पाइपलाइनचे काम करणेबाबत चर्चा केली.तसेच आपल्या आंदोलनाची दखल घेवून शासन व प्रशासन यांनी ४.५०(साडे चार कोटी) मंजूर करीत आहेत.परंतु त्याची लेखीस्वरुपात आदेश होण्याची विनंती केली आहे त्यामुळे कडेगांव व परिसरातील शेतीला पाणी व नागरिकांना पिण्याचे पाणी प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.टेंभुचे उन्हाळी आवर्तन सुरु करणार व कडेगाव तसेच शिवाजीनगर तलावात पाणी सोडण्यात येईल अशी संजय काका पाटील यांनी कडेगाव स्मार्ट सिटी ग्रुपला ग्वाही दिली.कडेगांवकरांच्या भल्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत.आमचा लढा फक्त आणि फक्त लोकांच्या फायद्यासाठी राहील हिच कडेगांव परीसरातील शेतकऱ्यांची व जनतेची मागणी आहे.