👉🏻चांदुर बाजार चे सहायक पोलीस निरीक्षक यांची बदली 👉🏻दिमाखदार राहिला अजय आकरे यांचा निरोप समारंभ *चांदूर बाजार:-///// शशिकांत निचत प्रतिनिधी

0
1218
Google search engine
Google search engine

*हेडिंग:-*
👉🏻चांदुर बाजार चे सहायक पोलीस निरीक्षक यांची बदली
*सब -हेडिंग*
👉🏻दिमाखदार राहिला अजय आकरे यांचा निरोप समारंभ

*चांदूर बाजार:-/////प्रतिनिधी*

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, चांदुर बाजार चे निरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे चांदुर बाजार पोलीस स्टेशन यांची तिवसा या ठिकाणी बदली करण्यात आली आहे . लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत.
ठाणेदार अजय आकरे यांनी अनेक पेंडीग केस निकाली काढल्या. तर भारतीय स्टेट्स बँक मधील लाखो रुपयांचा अपहार त्यांनी उघडीस काढला.जवळपास या गुन्ह्यात 115 आरोपीची चार्जसिटचे काम त्यांनी सुरू केले होते,मात्र त्यांच्या या बदली मुळे नवीन ठाणेदार याना चागली कसरत करावी लागणार हे नक्की.पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेतीमाफिया आणि अवैध धंदेवाल्यांवर अंकुश ठेवण्यातही त्यांनी यश मिळवले.अलीकडे शहरातील वाहतूक पोलिसांवर होणाºया हल्ल्याच्या घटना तसेच शहरातील बेशिस्त वाहतूक आणि ऑटोवाल्यांना लगाम घालण्यासाठी त्यांनि स्वतः पेट्रोलींग द्वारे वाहतूक सुरळीत केली. एक अभ्यासू, हसतमुख आणि सौजन्यशील अधिकारी म्हणून अजय आकरे यांनी ओळख निर्माण केली आहे. पोलीस स्टेशन मधील भ्रष्टाचाराला नियंत्रित करण्यासाठी आकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कर्तव्याऐवजी वसुलीला प्राधान्य देणाऱ्या पोलिसांना वठणीवर आणण्याचेही त्यांनी बरेच प्रयत्न केले. आता त्यांच्याकडे तिवसा पोलीस स्टेशन मधील अवैध धंदे आणि गुन्हेगारांना सरळ करण्याची जबाबदारी आली आहे.
दरम्यान त्यांचा दिनांक 22 ला स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये निरोप समारंभ ठेवण्यात आला.हा समारंभ शाही पद्धतीने करण्यात आला.यावेळी चांदुर बाजार चे प्रथम नागरिक अध्यक्ष नगर परिषद रवींद्र पवार,नगरपरिषद सभापती अतुल रंघुवंशी,आनंद अहिर,पत्रकार मदन भाटे,शशिकांत निचत,वैभव उमक, माजीद इकबाल आणि पोलिस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक आशीष चौधरी, शरद भस्मे आणि कर्मचारी उपस्थित होते.

0000