घुईखेड येथील दुर्गा देवी मंदिराची दानपेटी फोडली अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

0
754
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील दुर्गा देवी मंदिराची दानपेटी अज्ञात आरोपीने फोडुन ६ ते ७ हजाराची रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार रात्री १० ते रविवार सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली आहे.
     घुईखेड गावामध्ये दुर्गा देवीचे मंदिर असुन या मंदिरातील दानपेटीमधील नगदी अंदाजे ६ ते ७ हजार रूपये दानपेटी फोडून अज्ञात चोरीने लंपास केले. याबाबतची तक्रार गावातील रूपेश भोयर यांनी तळेगाव दशासर पोलीसांना रविवारी सकाळी दिली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवी कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सब इन्सपेक्टर वसंत राठोड हे करीत आहे.