उद्योजक देवदत्त मोरेंच्या उमेदवारीचा दिग्गजांनी घेतला धसका !

0
984
Google search engine
Google search engine

उद्योजक देवदत्त मोरेंच्या उमेदवारीचा दिग्गजांनी घेतला धसका !

उस्मानाबाद -एखाद्या राजकिय पक्षालाही लाजवेल असे स्वखर्चातुन सामाजीक कार्य करत सर्वसामांन्याःसाठी देवदुत बनलेल्या सामाजीक कार्यकर्त्याच्या लोकसभा उमेदवारीचा आनेकांनी धसका घेतल्याचे दिसत आहे.
सध्या सर्वञ लोकसभा निवडनुकीचे जोरदार वारे वाहत आहे. विवीध पक्षातील ईच्छुकांनी गुढग्याला बाशिंग बाधुन उमेदवारीसाठी मोर्चेबांधनी सुरु केली आहे.राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत माञ मतदारसंघात सध्या एकच सामाजीक कार्यकर्त्याच्या नावाची चर्चा सुरु आहे ते म्हणजे सर्वसामान्याचे देवदुत बनलेल्या देवदत्त मोरे यांची .विद्यमान लोकप्रतीनिधी शासकीय निधी विकासकामावर खर्च करन्यात कमी पडात आहेत .गेली ३५ वर्ष जिल्यावर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी कँग्रेस,कँग्रेस पक्षाने जिल्ह्याचा विकास आपेक्षेप्रमाने केला नाही त्यामुळेच जिल्हा निति आयोगाच्या निकषात मागास राहीला.जिल्हात म्हणावे तशी रोजगार निर्मीती झाली नाही . उस्मानाबाद जिल्ह्यातुन विभाक्त झालेला लातुर जिल्हा तुलनेने पुढे गेला .जनतेने युतीवर विश्वास ठेऊन प्रा रविद्र गायकवाड यांना विजयी केले माञ ते देखील नेहमीच नँट रिचेबल राहीले. गेल्या पाच वर्षात देखील कसलाच विकास झाला नसल्याचे बोलले जात आहे.राजकारणात घराणेशाही वाढाली आहे. टक्केवारीच्या राजकारणामुळे विकास खुंटला आहे.आशा परिस्थितीत जन्माभुमीतील नागरीकांना दीलासा मिळावा यासाठी स्वखर्चातुन देवदत्त मोरे यांनी आनेक सामाजीक कार्य सुरु केले आहेत .आत्तापर्यत जवळपास ९कोटी रुपयाची कामे झाली आहेत .यात जलयुक्त शिवार,धार्मिक स्थळांसाठी सभामंडप ,शिखर व ईतर बांधकाम ,आद्यावत रुग्णालय, आत्महत्यागृस्त शेतकरी कुटुंबास मदत ,विवाह सोहळ्यास आर्थिक हातभार यासह आनेक सामाजीक कार्य सुरु आहेत .मोरे यांचे सर्वच राजकिय पक्षासोबत व पदाधिकार्यासोबत सलोख्याचे संबंध आहेत .लोकसभा निवडणुकीत मोरे बहुजन वंचीत आघाडीकडून निवडानुक लढवतील आशी शक्यता व्यक्त केली जात होती माञ वंचीत आघाडीने सलगर यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा आनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला .निवडणुक कशी लढणार हे गुलदस्त्यात ठेऊन कोणात्याही राजकिय पक्षाच्या दावनीला बांधुन किंवा ठरावीक विचारधारेमुळे जनतेचा विकास होऊ शकत नाही आशी विचारधारा आसलेले देवदत्त मोरे आपक्ष निवडणुक लढाविण्याची तयारी करत आसल्याचे समाजते .मोरे फाऊडेशनच्या माध्यमातुन संपुर्ण मतदारसंघात युवकांची फळी निर्मान केली आहे.देवदत्त मोरे यांचा शांत व मनमीळाऊ स्वभावामुळे तसेच आभ्यासु विकासाच्या विचारधारेमुळे त्यांच्याकडे मतदारांचा औढा वाढत आहे .त्यामुळेच मोरे यांच्या उमेदवारीचा आनेकांनी धसका घेतल्याचे दीसत आहे.जनतादेखील बरबटलेल्या राजकिय पक्ष व पुढा-याना बाजुला सारुन आभ्यासु उमेदवाराला संधी देतील आसे दिसते.