आकोटात चर्मकार समाजा द्वारा शोभायात्रा रद्द करुन शहिदांच्या कुटूंबांना दिला निधी

0
567
Google search engine
Google search engine

आकोट,दि.22:- आकोट येथील चर्मकार समाजाने गुरु रविदास महाराज यांच्या जयंती निमित्य काढण्यात येणारी शोभायात्रा रद्द करुन या शोभायात्रेकरिता येणार्‍या खर्चाची रक्कम पुलवामा येथील शहीद जवानांनाच्या कुटूंबांना देण्याचे ठरवुन श्रध्दांजली वाहिली.

आकोट तालुक्यातील चर्मकार समाज बांधवांनी गुरु रविदास महाराज व शिव जयंतीचे आयोजन राजदे प्लॉट मध्ये केले होते. या ठिकाणी रुग्ण तपासणी व औषधोपचार करण्यात आला. तसेच शुगर, हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली. या आरोग्य सेवेकरिता डॉ.कैलास मालखेडे, डॉ.भागवत थोरात, डॉ.राहुल गावंडे यांनी सहकार्य केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी शहरातून काढण्यात येणारी संत रविदास महाराज यांची मिरवणुक रद्द करुन जमा झालेला निधी शहीदांच्या परिवारांना देण्याचे ठरवुन श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर राजदे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुखदेवराव पटके, गोपाळराव इंगळे, रमेश ठोसर, देविदास मालखेडे, गोपाळराव चापके, जानराव वानरे, देवराव बुंदिले, दौलतराव डामरे, महादेव सातपुते उपस्थित होते.

प्रास्ताविक रविंद्र मालखेडे, संचालन देविदास डामरे तर आभार ज्ञानेश्वर धामणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीधर कळसकर, गजानन डामरे, निवांत इंगळे, आकाश धुमाळे, गोपाल स. डांगे, गोकुळ पानझाडे, विजय धुमाळे, अनिल बुंदिले, सुधाकर पिंजरकर, मदन राजदे, शिवशंकर पिंजरकर, प्रविण चापके, गजानन डांगे, गणेश पटके, विशाल पटके, उदय चंदन, योगेश दहिकार, सावळे, संजय तुंबळे, रामदास चंदन, भगवान लांडे, श्रीराम वानरे, रामदास भागवतकर, गोपाल वानरे, बिंदेश राजदे, गजानन ढाकरे, दिपक पिंगळे, मनिष लोंढे, तायडे, काशिनाथ डांगे, भास्कर थोटे, राजू गवई, बी.बी.इंगळे यांच्यासह महिला वर्ग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.