शेतातील जनावरे व धान्य चोरणारी टोळी बाळापूर पोलिसांच्या ताब्यात, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

0
937

अकोला/प्रतिनीधी

बाळापूर पोलिसांनी एक महिन्या पूर्वी शेतकऱ्यांचे शेतात ठेवलेले धान्य चोरणारी धनेगाव येथील एक टोळी गजाआड करून त्यांचे कडून हजारो रुपये किमतीचे धान्य व पिकउप वाहन जप्त केले होते, अश्याच प्रकारे शेतकऱ्यांचे शेतातील तात्पुरत्या गोडाऊन मध्ये ठेवलेले धान्य व गोठ्यात बांधलेली जनावरे पिकअप वाहनात चोरून नेऊन विक्री करणारी 7 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात बाळापूर पोलिसांना यश मिळाले आहे,

पोलीस सुत्रानुसार वाडेगाव येथील शेतकरी शेख मूस्ता क शेख इस ताक ह्यांनी त्यांचे शेता मधील गोडाऊन मध्ये ठेवलेली 4 क्विंटल गहू व 4 बकऱ्या व 2 बकऱ्यांची पिल्ले एकत्रित किंमत 26,000 रुपये कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले त्यांचे फिर्यादी वरून पोलिस स्टेशन बाळापूर येथे दिनांक 21 ।1 19 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच फिर्यादी संजय उत्तमराव जायेभाये राहणार वाडेगाव ह्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती की त्यांचे शेतातील तात्पुरत्या गोडाऊन मधील 19 कट्टे तूर किंमत 57 हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरा ने चोरून नेल्याने पोलीस स्टेशन बाळापूर येथे दिनांक29।1।19 रोजी गुन्हा दाखल करुन वाडेगाव चौकीचे पोलीस तपास करीत होती, बाळापूरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली वाडेगाव चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, हेड कॉन्स्टेबल विनायक पवार, सुभाष राठोड हे तपास करीत असतांना खात्री लायक माहिती मिळल्यावरून वाडेगाव येथील अर्जुन विष्णू म्हैसने, ज्ञानेश्वर रामदास चिंचोळकर, वैभव कैलास शेगोकर, लक्ष्मण सोनटक्के, दीपक हरिहर लोखंडे, गजेंद्र नारायण लोखंडे, आशिष दशरथ शिंदे ह्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही चोऱ्या केल्याची कबुली दिली असता त्यांचे कडून चोरी गेलेला मुद्देमाल व चोरी करण्या साठी उपयोगात आणलेले 2 पिकअप वाहने असा एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून ह्या टोळीने परिसरात आणखी चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय असून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील, हेड कॉन्स्टेबल विनायक पवार, विजय जमणिक, सुभाष राठोड, हेमंत गर्जे, गणेश गावंडे, विशाल जावळे हे करीत आहेत, 1 महिन्याच्या कालावधीत पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात बाळापूर पोलिसांनी दोन टोळ्या गजाआड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी बाळापूर पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे।