महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची अवैध प्रवासी वाहनांवर कारवाईची मागणी

0
754
Google search engine
Google search engine

अकोट प्रतिनिधी

शहरातून अकोट ते अकोला, परतवाडा, हिवरखेड, दर्यापूर, धारणी आदी ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारया वाहनांवर कारवाई करण्यात यावी .अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्हाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
अकोट तालुक्यातून जाणारया सर्व मार्गांवर लक्झरी, काळीपिवळी या वाहनांव्दारे सर्रास अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे.विना परमिट असलेले वाहनधारक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. या अवैध वाहतुकीमुळे अपघात घडून नागरिकांचे प्राण गेल्याच्या व जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत,घडत आहेत.त्यामुळे अशा अवैध प्रवासी वाहतूक करणारया वाहनांवर कडक कारवाई करावी.

येत्या ५ दिवसात यावर कारवाई न झाल्यास पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन जिल्हाध्यक्ष गोपाल नारे, जिल्हा उपाध्यक्ष शेख अहेमद, प्रकाश आम्ले, जगन्नाथ कोंडे, स्वप्निल सरकटे, गणेश वाकोडे, निलेश झाडे, महेश देवर,प्रमोद सावरकर,अशोक झामरे, कुशल भगत, निरंजन गावंडे, गोवध॔न चव्हाण, कमलेश राठी आदींनी दिले.असे महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाच्या वतीने कळविण्यात आले आहे.