परळी वैद्यनाथ नगरी भाविकांनी आणि विद्युत रोषणाईनी झाली तेजोमय

124

बीड: नितीन ढाकणे, दिपक गित्ते

रविवारी दुपारपासूनच भाविक परळी वैद्यनाथाच्या पावन नगरीत दाखल होत आहेत. रविवारी रात्री 12 पासून महाशिवरात्रीच्या पावन पर्वाला सुरुवात होणार आहे. यासाठी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली असून,पास धारकांची वेगळी रांग असेल.पासचे मूल्य 100 रुपये आहे.वैजनाथच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त दर्शनासाठी येत असल्याने भक्तांच्या दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टकडून विशेष सोय करण्यात आली आहे.मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर लोखंडी बॅरीकेटिंग करण्यात आली असून भव्य मंडपही उभारण्यात आला आहे. मंदिराला विद्युत रोशनाईही करण्यात आली आहे. मंदिर परिसरात 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही असणार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।