‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या २ धर्मांधांना अटक

579

बेळगाव – येथे ४ धर्मांधांनी ३ मार्च या दिवशी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या वेळी संतप्त नागरिकांनी धर्मांधांचा पाठलाग करत दोघांना चोप दिला, तर दोघेजण पसार झाले. यानंतर दोघांना पोलिसांच्या कह्यात देण्यात आले.

पुलवामा आक्रमणानंतर देशात संतापाची लाट उसळली असतांना काहीजण सामाजिक संकेतस्थळावर पाकिस्तानचा जयजयकार करत आहेत. नुकतीच रामदुर्ग येथील एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या फेसबूकवर पाकिस्तानची घोषणा ‘शेअर’ करण्यात आल्याने या प्रकरणी त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर संतप्त जमावाने दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना ताजी असतांनाच ४ धर्मांधांनी उपरोक्त प्रकार केला. अटक केलेल्या दोघांची मार्केट पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।