संपत्तीच्या करावरील व्याज माफीसाठी यवतमाळच्या धर्तीवर ठराव घ्या शहरातुन मागणीचा सुर

0
602
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 

        चांदूर रेल्वे शहरातील अनेक मालमत्ताधारकांना नगर परिषदेने वेळेवर कर न भरल्याने शास्ती आणि विलंब शुल्क लावला आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढतच आहे. संपत्तीच्या कराच्या तत्काळ वसुलीसाठी यवतमाळ महानगरपालीकेत घेतलेल्या ठरावाच्या धर्तीवर चांदूर रेल्वे नगर परिषदमध्ये सुध्दा ठराव घेण्याच्या मागणीचा सुर शहरातुन निघत आहे.

        चांदूर रेल्वे नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांची वसुली दरवर्षी स्थानिक नगर परिषदेमार्फत करण्यात येते. परंतु पैसे भरण्यास उशीर झाल्यामुळे नगर परिषदेकडून लावण्यात येणाऱ्या दंड आणि व्याजामुळे नागरिक कर भरण्यास तयार राहत नाहीत. त्यामुळे थकबाकीचा आकडा वाढत चालला असल्याचे समजते. मालमत्ता कराची वसुली ९० टक्के झालीच पाहिजे, असे शासनाने बंधनकारक केले आहे. परंतु ऐवढी वसुली होत नाही असे समजले. शास्ती आणि काही विलंब शुल्क माफ केल्यास नागरिक उत्स्फूर्तपणे मालमत्ता कर भरतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी आता चांदूर रेल्वे नगर परिषदेकडून यवतमाळ मध्ये घेण्यात आलेल्या ठरावा सारखाच ठराव घेऊन नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी शहरातुन होत आहे. त्यामुळे आता यासाठी कोण पुढाकार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.