200 मीटर मध्ये एकूण सात अनधिकृत स्पीड ब्रेकर,ठेकेदार सांगत याचे त्याचे नाव उपविभागीय अधिकारी करणार का ठेकेदार वर कार्यवाही?

0
925
Google search engine
Google search engine

200 मीटर मध्ये एकूण सात अनधिकृत स्पीड ब्रेकर,ठेकेदार सांगत याचे त्याचे नाव
उपविभागीय अधिकारी करणार का ठेकेदार वर कार्यवाही?

चांदुर बाजार//बादल डकरे

चांदुर बाजार तालुक्यातील माधान-काजळी-देउरवाड़ा -शिरजगाव कसबा या रोडचे बांधकाम सुरू असून या रोड मध्ये सुरुवाती पासून निकृष्ठ दर्जाचे बांधकाम होत असल्याचे चित्र दिसून आले होते मात्र तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत होते.मात्र रोड मधील गिट्टी, कमी दर्जाचे डांबर याकडे लक्ष द्यायला अधिकारी यांना वेळच नव्हता.याची तक्रार झाल्यानंतर काही काळ या रोडचे बांधकाम बंद राहिले मात्र आपला काळा बाजार ओळखू येऊ नये या साठी ठेकेदार यांनी शिरजगाव ते देउरवाड़ा या रोडच्या बांधकाम अधिक जास्त गतीने केले.त्यामुळे रोड मध्ये कोणत्या प्रतीचे साहित्य वापरले गेले हे फक्त त्या ठेकेदार यालाच माहिती.त्यामुळे या रोडचे गुणवत्ता किती दिवस टिकणार हा प्रश्न आहे.

तर देउरवाड़ा बस स्टँड पासून ते समोर 200 मीटर च्या अंतरामध्ये अनधिकृत स्पीड ब्रेकर टाकून हे ठेकेदार जनसामान्य जनतेच्या जीवावर तर उठले नाही अशा प्रश्न आहे.ज्या ठिकाणी आवश्यक नाही त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आले.त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता निलेश चौधरी या कडे लक्ष देऊन त्या मनमानी करणाऱ्या ठेकेदार वर कार्यवाही करतील का हे पाहावे लागतील.

बॉक्समध्ये
एक आदर्श स्पीड ब्रेकर ची उंची10 सेंटीमीटर, लांबी3.5 मीटर आणि वृत्ताकार क्षेत्र किंवा म्हणजे कर्वेचर रेडियस 17 मीटर असली पाहिजे.त्याचा प्रमाणे ड्रायव्हर च्या माहिती साठी स्पीड ब्रेकर च्या आधी 40 मीटर वर चेतावणी बोर्ड लावणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया:-
1)आम्ही आमच्या मताने स्पीड ब्रेकर टाकले नाही.सोनार याचा फोन आला होता म्हणून स्पीड ब्रेकर टाकण्यात आले.
*मोबिंन ठेकेदार रोड बांधकाम*

2)मी ठेकेदार याना ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे तिथं टाकायला सांगितले होते.त्यामुळे त्याने एक दोन ठिकाणी अनधिकृत स्पीड ब्रेकर टाकले आहे.
*विकास सोनार अध्यक्ष विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस*

3)प्राथमीक आरोग्य केंद्र जवळील स्पीड ब्रेकर हा जीवघेणा आहे.तसेच बालाजी संस्थान कडे जाणाऱ्या रोडच्या तिथं स्पीड ब्रेकर पाहिजे होते मात्र त्याच्या मर्जी ने त्याने स्पीड ब्रेकर टाकले आहे.
*सरपंच अमोल भोगाडे देउरवाड़ा*
4)
मी रोडची पाहणी केली लोकांच्या मागणी वरून स्पीड ब्रेकर टाकले आहे.अनधिकृत स्पीड ब्रेकर काढायला सांगतो.
*निलेश चौधरी उपकार्यकरी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चांदूर बाजार*