ज्ञानरुप अवस्थेतील कर्म सर्वोश्रेष्ठ. — ह.भ.प.जयवंत महाराज

0
1090
Google search engine
Google search engine

गुरुमाऊलींच्या जयंती महोत्सवानिमित्य ज्ञानेश्वरी भावकथा

आकोट/ता.प्रतीनीधी दि.५ः
ज्ञान आणि अज्ञानाचे अवस्थेत कर्म हे घडत असतं! मनाच्या अवस्थेचा देखील त्यावर परिणाम घडतो.आचरणाची भूमिकाही तेवढीच महत्वाची आहे.अनुकुल आणि प्रतिकुलता त्यात निर्माण होते.कर्म हे पाप पुण्याची संगती आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.नियतीची स्थिती आणि कर्माची स्थिती एकच.ज्ञानरुप अवस्थेतील कर्म हे सर्वोश्रेष्ठ आहे.असे कर्म स्थितप्रज्ञ होवूनच आकाराला येते असे मौलिक चिंतन श्री ज्ञानेश्वरीचे प्रवक्ते ह.भ.प.अॕड.जयवंत महाराज बोधले यांनी येथे मांडले

गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवातील श्री ज्ञानेश्वरी भावकथा निरुपणाचे चौथे पुष्प गुंफतांना जयवंत महाराज बोलत होते.आजच्या निरुपणात “युद्ध नको” या अर्जुनाच्या द्विधा मनस्थितीचे सुंदर वर्णन भाविक श्रोत्यांना भावविवश करणारे होते.महाराज पुढे म्हणाले सत्य आणि असत्य,चांगले -वाईट,अनुकूल प्रतिकुल ,धर्म अधर्मात सतत युद्ध सुरु असते.हा नियतीच्या स्थितीचा दृष्य परिणाम आहे.कर्माची आणि नियतीची भूमिका एकच असते.कर्मातून पाप पुण्य निर्माण होणार आहे.परंतू कर्माला ज्ञानरुप अवस्था प्राप्त झाल्यास परिणामाची चिंता राहत नाही. समग्र बुद्धी व स्थितप्रज्ञ होवून केलेल्या कुठल्याही कर्म होतांना पाप-पुण्य मनात प्रश्न निर्माण होत नाही. सुख दुःखाच्या पलिकडे जावून केलेले कर्म सदैव न्यायसंगत असतं.असे कर्म आपसूकच निष्काम असते.अशी ज्ञानरुप अवस्थेत केलेले कर्म सर्वश्रेष्ठ असते असे जयवंत महाराज म्हणाले.

‘युद्ध नको’ ही अर्जुनाची ही स्थिती ज्ञान असूनही त्यात अज्ञान प्रगट झाल्याने भगवंतालाही आश्चर्य वाटले.या द्विधा मनस्थितीतून अर्जूनाला बाहेर काढण्यासाठी भगवंताला दिव्यदृष्टीने गीता सांगावी लागली.महाभारत हे धर्म आणि अधर्मातील युद्ध होतं.पांडव आणि कौरव ही पात्रे वृत्तींचं प्रतिनिधित्व करतात.जाणता असूनही नेणत्या अर्जूनाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ज्ञानरुप व स्थितप्रज्ञाची अवस्था निर्माण करावी लागली .भगवंताने आपले
आपले निहीत कर्म पार पाडण्यासाठी गीता तत्वज्ञान सांगितले.हे तत्वज्ञान चिरकालातीत आहे.हे तत्व समजून घेणे.चिंतन ,मनन व आचरणाचा विषय आहे असे जयवंत महाराजांनी शेवटी सांगीतले.
भावकथेला भाविक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.