देवदत्त मोरेंची उमेदवारी ठरतेय सर्वच पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी

0
1241

उस्मानाबाद / प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीचा रंग जस जसा चढत आहे तसतशी लोकसभा लढवणाऱ्या इच्छुकांची नावे सामोर येत आहेत . मागासलेल्या यादीत शेवटून तिसरा असणारा आपला जिल्हा हवा , पाणी आणि आणि तुळजाभवानी अशी ओळख . विकास होणार तरी कसा हा आ वासून उभा राहिलेला प्रश्न , मागील काही वर्षांपासून जिल्ह्याचा विकास व्हावा हि कामना घेऊन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जिल्ह्यातील उद्योजक मंडळी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चून विकास कामांना मूर्त स्वरूप देत आहेत . त्यामध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील उद्द्योजक देवदत्त भागवतराव मोरे मागील ९ वर्षांपासून निःस्वार्थपणे जिल्हाभरात समाजसेवेचे काम करीत आहेत. एकेकाळी पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलेला हा युवक प्रचंड मेहनत करून कष्ट करून स्वतःचा उद्योग धंदा उभारतो आणि पुढे चालून आपल्या मातीतल्या लोकांसाठी मददगार बनतो . खरे तर हा प्रकार एखाद्या ३ तासाच्या सिनेमा आपण पाहतो पण प्रत्यक्षात उतरवले देवदत्त मोरे साहेबांनी. २०१० ला कसबे तडवळे येथील ग्रामदैवत श्रीराम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे सभामंडपाचे बांधकाम करून विकास कामाचा शुभारंभ केला. या परिसरात अनेक मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम त्यांनी केले. येडशी येथील सुप्रसिद्ध व ऐतिहासिक रामलिंग मंदिराच्या शिखराचे बांधकाम , श्री मन्मथस्वामी मंदिराची उभारणी , ताडवेल येथील ग्रामदैवत भैरुल्लाशाह दर्गा मैदानाचे सुशोभीकरण व भक्त निवारा शेड , खंडोबा मंदिराचे शिखर सभा मंडप , गावातील बौद्ध समाजाच्या नागरिकांना लग्न कार्यासाठी व इतर कार्यक्रमासाठी प्रशस्थ सभामंडप असावा यासाठी बुद्ध विहारासमोर अतिशय देखणा सभामंडप उभारला. गोपाळवाडी येथे हनुमान मंदिराचे शिखर बांधकाम , जवळा येथे हनुमान मंदिर व दुधगाव येथे श्रीकृष्ण मंदिर उभारले , कोंबडवाडी येथे ज्योतिबा मंदिराला बांधकाम करण्यासाठी मदत केली. विविध धर्माच्या नागरिकांना त्यांच्या देवस्थानाला मोरे साहेबांनी मोठी आर्थिक मदत केली . अपेक्षा घेऊन आलेला माणूस रिकाम्या हाताने परत जाणार नाही हि देवाने त्यांना दिलेली देणगी. लग्न कार्यासाठी आर्थिक मदत असो व जोडप्यांना संसारउपयोगी समान रस्ताही मोरे साहेब पंचकृषीतील सामान्यांसाठी नेहमी उपयोगी पडतात. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दर्जेदार घेता यावे यासाठी जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत वर्गाला एक याप्रमाणे १६ टॅब भेट देऊन शाळा संपूर्ण डिजिटल केली . शाळेतील मुलींची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती थांबावी म्हणून स्वतंत्र विंधन विहीर घेऊन पाण्याची सोया केली.
शेतकीरी शेतमजूर, छोट्या – मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करता यावी या उद्देशाने गावातच अभिमन्यू पतसंस्थेची स्थापना केली. शेतकऱ्यांना व गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नयेत म्हणून गावशिवरातून जाणाऱ्या गावाजवळील नदीचे दहा कि.मी. नदीचे ७५ लाख रुपये खर्चून खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाचे काम केले. यामुळे प्राईसरातील ४०० हेक्टर पेक्षा जास्त शेतीला लाभ मिळाल्याने शेतकऱ्यांतून त्यांचे कौतुक होत आहे.
धार्मिक कार्यासाठी त्यांची ख्याती असून जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराज यांची गावाला मोठा प्रवचन व दर्शन सोहळा घेतलेला आहे.तसेच अनेकवेळा त्यांनी जिल्ह्यातील धार्मिक उपक्रमाला आर्थिक साहाय्य केले आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या मोठ्या यात्रा, उत्सव, गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव, महापुरुषांच्या जयंत्या अशा कार्यक्रमांनाही मोठा आर्थिक हातभार लावलेला आहे. जिल्ह्यात अनेक यात्रेत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केलेला आहे .त्यांना कोणताही राजकीय वारसा नसतानाही जिल्ह्याच्या विकासासाठी प्रस्थापितांनाही लाजवेल अशा प्रकारे स्वतः च्या खिशातील कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या या दानशूर उद्योजक देवदत्त मोरे यांची ख्याती उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरू लागली आहे.जिल्ह्यात कोणत्याही सामाजिक कार्यात ते हिरीरीने भाग घेतात. कोणताही यात्रा, सामाजिक कार्यक्रम असल्यास ते स्वेच्छेने मोकळ्या हाताने मदत करत असल्याने गेले १० वर्षा पासून उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांच्या विषयी नागरिकांत आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे. गणेशोत्सव काळात तर जिल्ह्यात कोठेही बोलाववले कि आरतीला त्यांच्या आवर्जून उपस्थितीत दिसून येत होती. उस्मानाबाद शहरात व जिल्ह्यातील गणेशोत्सवानिमित्त अनेक मंडळांना सहकार्य केलेले आहे. तडवळा येथील भैरुल्लाशाह कादरी यांचा न भूतो न भविष्यती असा केलेला उरूस त्यांच्या सामाजैक बांधिलकीचे प्रतीक आहे.
सकारात्मक मानसिकता असणाऱ्या व्यक्तीची मागास उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी गरज असल्याची भावना किळ वाशीयामधून व्यक्त होत असताना जिल्ह्याचे भूमिपुत्र व उद्योजक देवदत्त मोरे यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवावी अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे .त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या उमेदवारांना उद्योजक देवदत्त मोरे यांची उमेदवारी हि डोकेदुखीच ठरणार आहे.मात्र जनतेलाही हावा आहे नविन चेहरा यात शंकाच नाही