देवदत्त मोरेंच्या उमेदवारीने मातब्बरांना घाम फुटणार

185

उस्मानाबाद / प्रतिनिधी – सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा ज्वर राज्यातच नव्हे तर देशभरात वाढलेला आहे. विविध राजकीय पक्षातील इच्छुक उम्मेदवारांनी उम्मेदवारीसाठी आपला नंबर कसा लागेल याचे प्रयत्न सुरु केले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गेल्या सहा महिन्यापासून लोकसभा निवडणुकीचे वादळ घोंगावत आहे. या वादळामध्ये तडवळ्यातील प्रसिद्ध उद्योजक देवदत्त मोरे यांची मात्र समाजकार्यात दानशूर मदतीतून एक वेगळी ओळख चर्चेमद्धे येत आहे. देवदत्त मोरे अर्थात सर्वसामांन्यांचा देवदूत बनलेल्या या धाडसी व्यक्तिमत्वाविषयी सांगायचे झाले तर देवदत्त मोरे यांनी गेल्या अनेक दिवसा पासून स्वखर्चातून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे . जवळपास दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वेग वेगळ्या कार्यासाठी देवदत्त मोरे यांनी खर्च केलेली आहे . गावागावातील धार्मिक स्थळांचे जीर्णोद्धार , सभामंडप ,शिखर इतर कामांसह आत्महत्याग्रस्थ शेतकरी क्यूमबातील उघड्यावर बसलेल्या परिवाराला सढळ हाताने मदत करण्यासाठी मोरेंनी धाव घेतलेली आहे . आर्थिक अडचणीमुळे विवाह होऊ न शकणाऱ्या गरजूंना या विवाह सोहळ्यामध्ये आर्थिक हातभार लावण्याचे काम मोरे यांनी सुरु केले आहे. सामाजिक आणि राजकीय अशा दोन्हींही व्यासपीठावर मोरे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये देवदत्त मोरे निवडणूक रिंगणात उभे राहणार हि चर्चा वेग धरू लागली आहे. कोण्या एका राजकीय पक्षाच्या दावणीला उभे न टाकता देवदत्त मोरे यांनी समाजकार्यातून जनतेमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल मात्र देवदत्त मोरे नावाचे सामाजिक चळवळीतील घोंगावले वादळ निवडणुकीच्या आखाड्यातून मातब्बर आणि प्रस्थापित राजकीय नेत्यांचा धाम काढणार इतपत वातावरण निर्मिती मोरे यांची झालेली आहे. आजवर जिल्ह्याचा झालेला विकास पाहता एकाही लोकनेत्याने जिल्ह्याच्या विकासासाठी यपोगंडानं दिलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये देवदत्त मोरे यांनी बोलण्यापेक्षा कृतीतून आपली ओळख करून दिलेली आहे जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये गावागावात विस्वासू कार्यकर्त्यांची फळी उभी करून देवदत्त मोरे मित्रमंडळाचे डंका वाजू लागलेला आहे. आता केवळ येणाऱ्या काही दिवसांमध्येच मोरे यांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे स्पष्ट होईल मात्र त्यांचे वादळ जिल्ह्याच्या राजकरणातील वातावरण पूर्ण ढवळून काढणार यात तिळमात्र शंका नाही.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।