नादुरुस्त रोहित्र मुळे जीव धोक्यात घालून शेतकरी याना करावे लागत आहे ओलितरोहित्र दुरुस्ती करण्याची शेतकरी यांची मागणी

नादुरुस्त रोहित्र मुळे जीव धोक्यात घालून शेतकरी याना करावे लागत आहे ओलित
रोहित्र दुरुस्ती करण्याची शेतकरी यांची मागणी

बादल डकरे:—-काजळी देउरवाड़ा

ब्राम्हणवाडा थडी महावितरण सब स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काजळी शेतशिवार मध्ये रावळे रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकरी याना जीव धोक्यात घालून आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे तर हे रोहित्र महावितरण ने लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी यांची कडून होत आहे.
या रोहित्र च्या बुसींग मधूळ ऑइल गळत असल्याने वारंवार वीज पुरवठा बंद पडत असतो. त्याचे एका बाजूचा बुसींग चा केबल हा वारंवार जळला जात असल्याने रोहित्र वर मोठ्या ठिणग्या पडत आहे.तर रोहित्र मधील मेन झुज मध्ये तारा नसल्याने शेतकरी याना तार गेला असता त्यांना जीव धोक्यात घालवा लागत आहे.कडकाच्या उन्हामुळे सर्व पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.पण रोहित्र च्या नादुरुस्त मुळे शेतकरी याना नाहक त्रास होत आहे.
रात्रीच्या वेळी लाइन यवत असल्याने शेतकरी याना ओलित करायला जावे लागते.मात्र रोहित्र च्या या त्रासामुळे शेतकरी याना स्वतः मध्य रात्री रोहित्र वर चढवून काम करावे लागत आहे.त्यामुळे या बाबीकडे महावितरण आणि लक्ष्य देण्याची गरज आहे.

बॉक्समध्ये
*”शेतकरी यांच्या नावाचा वापर निवडणूक मध्ये मत मिळवण्यासाठी घेतला जातो.मात्र त्याच्या या अश्या गरजा कडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे.फक्त निवडणूक वेळी आपआपली पोळी शिजवण्याच्या मागे राजकीय नेते असतात.”*

प्रतिक्रिया:-
उन्हाळा ला सुरुवात झाली असून सर्वच पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.रावळे रोहित्र चा प्रश्न कर्मचारी यांनी सांगितलं आहे.एक दोन दिवसात मकेनिकल तिथंच बोलावून काम करून घेतो.शेतकरी याना होणार त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न लवकरच करू….

*1)शशिकांत राऊत कनिष्ठ अभियंता ब्राम्हणवाडा थडी सेंटर*

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।