पोकरा योजनेमध्ये बेलोरा महसुल मंडळात असना-या वडूरा या गावाचा समावेश करावा…अन्यथा जनआंदोलन करनार..प्रहार शेतकरी संघटना वडूरा यांचा इशारा….

0
1181
Google search engine
Google search engine

पोकरा योजनेमध्ये बेलोरा महसुल मंडळात
असना-या वडूरा या गावाचा समावेश करावा…
अन्यथा जनआंदोलन करनार..प्रहार शेतकरी संघटना वडूरा यांचा इशारा….

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( पोकरा ) अंतर्गत खारपान पट्ट्यात येना-या शेतजमीनी असना-या गावाची निव्वळ शासनाच्या माध्यमातून करन्यात येते.
यामध्ये चांदूरबाजार तालूक्यातील 36 गावाचा समावेश करन्यात आला आहे. एकूण 6 वर्षाकरीता हा प्रकल्प निवड झालेल्या गावात राबवायचा असून यावर जवळ पास 6 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पामध्ये भूमिहीन , अल्प भूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आपला जीवन स्तर उंचवावा म्हणून यामधून विवीध वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच सामूहिक योजनांचा समावेश करन्यात आला आहे.

माञ बेलोरा मंडळ मधील खारपान पट्ट्यात येनारे मौजा वडूरा या गावास वगळन्यात येऊन चांदूरबाजार मंडळात येना-या वडूरा या गावाची निवड करन्यात आली आहे.
यावर वडूरा येथील शेतकरी सुधीर ठाकरे यांनी तिव्र आक्षेप नोंदवून पाञ वडूरा हे गाव चांदूरबाजार मंडळ मधील नसून बेलोरा मंडळ मधील आहे हे विवीध पुरावे देऊन सबंधीत विभागाच्या लक्षात आनून दिले. त्यामुळे ख-या पाञ गावास या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी वडूरा येथील शेतकऱ्यांच्या वतीने कृषी अधिकारी , तहसीलदार व आमदार बच्चुभाऊ कडू यांचे कडे शेतकऱ्यांच्या वतीने सुधीर ठाकरे यांनी केलेली आहे.
या योजनेतून बेलोरा मंडळातील वडूरा या गावास वगळल्यास प्रहार शेतकरी संघटना वडूरा यांच्याकडून जन आंदोलन करन्यात येईल असा इशारा याप्रसंगी देन्यात आला आहे.