देशातील पहिल्या हायमस्ट लॅम्पयुक्त सारोळा गावाचे शानदार सोहळ्यात लोकार्पण

0
795
Google search engine
Google search engine

देशातील पहिल्या हायमस्ट लॅम्पयुक्त सारोळा गावाचे शानदार सोहळ्यात लोकार्पण

उस्मानाबाद / प्रतिनीधी – देशातील पहिल्या हायमस्ट लँपयुक्त सारोळा गावाचे लोकार्पण खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते मोठ्या शानदार सोहळ्यात मोठ्या थाटात करण्यात आले. खाग़ायकवाड यांच्या स्थानिक विकास निधीतून तब्बल १० हायमस्ट लॅम्पची उभारणी करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.७) या ऐतिहासिक कामाचे लोकार्पण हायमस्ट लॅम्पची लखलखती रोषणाई, आतषबाजी, टाळ-मृदंगाचा गजर, ढोल पथकाचा खणखणाट अनं जयघोषामध्ये करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे खा. गायकवाड यांच्या स्थानिक विकास निधीतून १० हायमस्ट लॅम्पची उभारणी करण्यात आली आहे. गुरुवारी शानदार सोहळ्यात या कामाचे लोकार्पण करण्यात आले. गावातील श्री हनुमान मंदिरासमोरील प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला. प्रारंभी बसस्टॉप येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री पद्मावती देवी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, संत रोहिदास महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक येथील लॅम्पचे खा. गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कामासाठी २० लाख रुपये निधी दिल्याबद्दल या ऐतिहासिक योजनेचे शिल्पकार भाजपाचे लोकसभा मीडिया प्रमुख धनंजय रणदिवे यांच्या वतीने खा. गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, भाजपाचे प्रदेश सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ, भाजपाचे जिप गटनेते ज्ञानदेव राजगुरु, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, उपनगराध्यक्ष तथा युवा सेना विस्तारक सुरज साळुंके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे, रासप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लता धनवडे, भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश देवगिरे, रमेश रणदिवे, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता पाशासाहेब, श्री श्रोते, श्री बनसोडे, कंत्राटदार डी. एस. भातलवंडे, तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के, शिवसेना जिल्हा संघटक प्रकाश तावडे, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख अजित लाकाळ, माजी तालुकाप्रमुख दिलीप जावळे, शिक्षक नेते प्रदीप मदने, सरपंच अंकुश मोरे, कमलाकर दाणे, भालचंद्र कठारे, सुधाकर देवगिरे, बालाजी कापसे, रावसाहेब मसे, पोलीस पाटील प्रितम कुदळे, पांडुरंग कुदळे, सोमनाथ कठारे, रमेश देडे, धनंजय काळे, बबलू रणदिवे, धनंजय रणदिवे मित्रमंडळाचे अध्यक्ष कलीम शेख, उपाध्यक्ष राहुल कापसे, समाधान काकडे आदींसह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.