आज गुरुमाऊलींचा जन्मोत्सव सोहळा

0
928
Google search engine
Google search engine

————————-
दिंडी सोहळा,अश्वांचे रिंगण,महाप्रसादाचे भव्य आयोजन
————————-
आकोट प्रतीनिधीं
गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराजांचा १०२वा जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे शनिवार दि.९ ला संपन्न होत आहे.या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून वासुदेव भक्त दाखल झाले आहेत.

या भक्ती सोहळ्याचा प्रारंभ गुरु मंदिरात श्री गुरुंचा महाभिषेकाने होत असून सकाळी ८ते ११ श्रींच्या रथाची नगर प्रदक्षणा व दिंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या दिंडी सोहळ्यात गांवोगांवच्या वारकरी दिंड्या सहभागी होत आहेत. दिंडीचा प्रारंभ गुरुमाऊलीचे निवासस्थानावरून होत आहे.

माऊलींच्या अश्वांचे रिंगण

दिंडी सोहळ्यात श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पंढरपूर वारीत सहभागी होणारे श्रीमंत शितोडे सरकार यांचे अश्वांचे उभे आणि गोल रिंगण होत असून अश्व श्रद्धासागर येथे दाखल झाले आहेत.
या भक्ती सोहळ्याची सांगता स.१०ते १२ ला ह.भ.प.श्री विठ्ठल महाराज कोरडे आळंदीकर

यांचे काल्याचे कीर्तन,गुरुवंदना,जन्मोत्सव सोहळा व तद्नंतर महाप्रसादाने होईल या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.