कसबे तडवळ्यात “सासर माहेर” कार्यक्रम उत्साहात साजरा

0
818

विवेक उबाळे

क तडवळे येथील जिल्ह्यापरिषद आदर्श केंद्रीय शाळेत या जागतिक महिला दिनानिमीत्त प्रथमतः शालेय व्यवस्थापन समिती सदस्या अनिताताई कदम व महानंदा पाचंगे यांच्या हस्ते सावित्री माऊलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .आलेल्या सर्व महिला भगिनींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .नंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम सुरेखा कदम यानी महिला दिनाचे महत्व सांगितले .तसेच अनिताताई नी महिला वर आधारित गीत गायले .सर्व महिलांनी स्वतः चे अस्तित्व व आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी बोलते झाले पाहिजे .तसेच ज्या समाजसुधारकानी आदर्श आपल्याला दिला आहे अशा भुतकालीन कर्तबगार महिलांचा वसा आपण चालविण्यासाठी व समाजाचे आपण काही तरी देणे लागत आहोत यासाठी व्यासपीठावर तिला मोकळेपणाने श्वास घेता आला पाहीजे अन ही काळाची गरज आहे.त्यामुळे प्रत्येक महिलांनी “”व्यासपीठाची वंदनीय “”या उपक्रमांतर्गत व्यासपीठावर येउनी बोलावे ..अशी ईच्छा भावना चौधरी यानी व्यक्त केली .यात महिलानी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन महिला दिनाबद्दल विविध विषयावर माहिती सांगितली. विषेश म्हणजे यात भातवाल्या मावशीने ही त्यांचा सत्कार केल्याबद्दल व्यासपीठावर येऊन शाळेचे आभार मानले .तदनंतर “”सासर माहेर “”हां उपक्रम घेण्यात आला .यात सासूबाई म्हणुन लाभलेल्या शालनताई जाधव व सुनबाई म्हणुन लाभलेल्या सारिकाताई जाधव यांची मुलाखत घेण्यात आली .यात महिला शिक्षिका रंजना ढोने , संगीता पाटील , दीपा सपकाळे , प्रतिभा कुलकर्णी यानी प्रश्नावली तयार करुन सासू सुनेची मुलाखत घेतली .यात विषेश म्हणजे सासू सुनेचे नाते हे दोन्ही बाजूने सांभाळले की मायलेक यात रूपांतरित होत असते .हे साऱ्यानां उमजले .तसेच एका हाताने टाळी वाजत नाहीच म्हणुन सासूने सुनेला व सूनेने सासूला समजून घेतले पहिजे हे सिध्द झाले .तसेच स्वाती पवार व वैशाली पवार यानीही आपले पारिवारिक अनुभव सर्वासमवेत शेअर केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंबिका कोळी तर आलेल्या महिला भगिनींचे आभार स्वाती पवार यानी मानले दुपारच्या सत्रात विविध उपक्रमाचे शाळेचे व्हिडिओ व कर्तबगार महिलाविषयक माहिती मुलाना ई साहित्याद्वारे दाखविण्यात आली .एकंदरीत दिवसभरातील आनंद उत्साह महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्यात दिसून आला .
या कार्यक्रमास विषेश प्रेरणा विस्ताराधीकारी किशोरीताई जोशी यांची मिळाली .व विशेष सहकार्य शाळेच्या मु अ सुरेखा टोणे व महात्मा ज्योतिबारुपी बापू लोंढे व बाळासाहेब जमाले यांचे लाभले .