खडतर प्रयत्न करून अखेर वैशाली सोळंके झाली फौजदार

0
971
Google search engine
Google search engine

खडतर प्रयत्न करून अखेर वैशाली सोळंके झाली फौजदार,

अमरावती:-कार्यलाय प्र.
आयुष्यात प्रत्येक गोस्ट शक्य आहे फक्त ती शोधता आली पाहिजे आणि त्यासाठी आवश्यकता आहे.ती जिद्द, चिकाटी ची मग एखादये ध्येय गाढण्यासाठी इतके जिद्द ठेवा की ध्येय पण आपल्या समोर नतमस्तक होतील.असेच काहीसे उदाहरण पाहायला मिळाले वैशाली सोळंके बाबत.नुकताच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाची निकाल जाहीर झाला या मध्ये वैशाली ने 9 वी रँक घेऊन पास झाली आहे.तर तिच्या या यशाचा सर्वा कडून कौतुक होत आहे.

*वैशाली चा अल्प परिचय*
15 वर्षांच्या आधी वडील सोडून गेले.सर्व जबाबदारी आई वर दोन मुली आणि आई वर खूप मोठी जबाबदारी असताना आपल्या दोन्ही मुलींना अधिकारी करण्याचे आईच स्वप्नं. वैशाली ची मोठी बहिणी रुपाली सोळंके ही पुरवठा विभाग वाशीम मध्ये काम करत आयवो (IO)या पदावर कार्यरत आहे.तर वैशाली ने नुकतीच महसूल विभाग ची मुबंई मंत्रालय मधील परीक्षा पास केलीहोती.मात्र स्वप्न हे फौजदारी असल्याने तीने आपले स्वप्न अखेर पूर्ण केले.आणि आपल्या आईचा तसेच बहिणीचा आनंद द्विगुणित केला.वैशाली ला तिच्या या यशासाठी मित्रांनी सुद्धा खूप मदत केली.

वैशाली सोळंके चे काय आहे मत.
वडील गेल्यानंतर आईवर खूप मोठी जबाबदारी होती.त्यानंतर माझी ताई सुद्धा फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाली होती.मात्र तिने पुरवठा निरीक्षक म्हणून काम पसंद केली.आणि आज मी फौजदार होऊन तिचे आणि माझ्या आई चे स्वप्न साकार केले.माझ्या या यशा मागे माझी आई,बहीण,मित्र याचे फार मोठे योगदान आहे.