शहीद चषक स्पर्धाच्या विजेत्यांनी रोख बक्षीस केले शहीद कुटुंबीयांना अर्पन

0
1119
Google search engine
Google search engine

शेगांव :- शेगांव शहरात दिनांक ८ मार्च ते १० मार्च रोजी स्व. गजानन दादा कॉटन मार्केट यार्ड येथे कब्बडी चे खुले सामने व बॉडी बिल्डिंग शरीर सौष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पुलवामा मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफ चे ४० जवान शहीद झाले होते त्या जवांनाना श्रद्धांजली म्हणून तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी या उदात्त हेतू ने राष्ट्रभक्त परिवार व राहुल खंडेराव यांच्याकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दानशूर व्यक्तींनी शहिदांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात योगदान दिले तर येणाऱ्या प्रेक्षकाने सुद्धा आपला वाटा त्यात दिला हे विशेष…
८ मार्च रोजी कब्बडीचे खुले सामने झाले तर १० मार्च रोजी रोमांचक असे बॉडी बिल्डिंग ची स्पर्धा संपन्न झाली यात ५० ते ६० वजन गटात सागर देशमुख, ६० ते ६५ वजन गटात मनोज पहुरकर , ६५ ते ७० वजन गटात स्मित भुसारे तर ७० ते खुला वजन गटात भारत बोडदे हे प्रथम मानकरी ठरले. यात विशेष म्हणजे आपण ज्या राष्ट्रात राहतो तर आपल काही तरी देणं राष्ट्राला आहे तर आपले प्रथम येण्याचे रोख बक्षीस य सर्व विजेत्यांना शहिदांच्या कुटुंबीयांना दिले यावेळी ज्ञानेश्वर दादा पाटील, शैलेंद्र पाटील, एपीआय सचिन चव्हाण, पी एस आय इंगोले, मा.नगरसेवक विजय यादव, सिटी न्युज चे रोहित देशमुख, इलेक्ट्रॉनिक मीडिया चे महेंद्र मिश्रा, पत्रकार समीर देशमुख,समाजसेवक राजेश पारखेडे, बजरंग दलाचे अमोल अंधारे,
समाजसेवक राकेश काशेलानी, उदय उगले, ज्ञानेश्वर गारमोडे, गणेश वसतकार, प्रकाश बोदडे, आकाश नावकार, श्याम अढाव, किशोर प्रजापत, गोविंद वानखडे, आदित्य देशमुख, चेतन झामरे, नितीन भोजने, ईश्वर
माळी, सुर्यकांत कडाळे, शुभम पाटील, विजय मुदलीयार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी
तांडव ग्रुप, रामदल मित्र मंडळ, माऊली सेवा ग्रुप, मोरया मित्र मंडळ, वन्दे मातरम् मित्र मंडळ, लिओ हेल्थ
क्लब यांचे सहकार्य लाभल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.