सोनाराची नजर चुकवून चोरी करणारी अट्टल महीला चोर बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात,

225

25,000 चे दागिने जप्त

अकोला/प्रतिनिधी
बाळापूर शहरातील स्टेट बँक रोड भागात असलेल्या नवकार ज्वेलर्स मधून 25,000 रुपये किमतीचे दागिने सोनाराची नजर चुकवून लंपास करणाऱ्या सोनटक्के प्लॉट अकोला येथे राहणाऱ्या एका अट्टल चोरटीला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन तिचे कडून चोरलेले 25,000 रुपये किमतीचे 25 बेसर जप्त करून 1 तासात चोरी उघडकीस आणली.

पोलीस सुत्रानुसार सदर गुन्ह्याची हकीकत अशी की बाळापूर शहरातीलSBI रोड वर विराग शिरीष कुमार शाह ह्यांचे सोन्या चांदीचे दागिने विक्रीचे दुकान असून आज 10।30 वाजता दरम्यान ते दुकानात असतांना एक स्त्री वुरखा घालून आली व तिने सोन्याचे बेसर मागितले, सोनाराने तिला 25 सोन्याचे बेसर असलेली स्ट्रीप दिली असता तिने आणखी पाहण्यास मागितले, सोनार दागिने काढीत असतांना त्या स्त्री ने बेसर घेऊन पोबारा केला, सोनाराच्या ही बाब लक्षात येताच त्याने बेसर शोधले ते दिसून आले नाही, त्याने ही बाब त्वरित बाळापूर पोलिसांना कळवली, पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्वरित पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, हर्षल श्रीवास, जयवंत शिंदे, गिरीश वीर महिला कर्मचारी मंगला काकण ह्यांना चोरटीचे शोधात पाठविले, नागरिकांच्या मदतीने व सोनाराने सांगितलेल्या वर्णनावरून दोन्ही हाताला कोड असलेल्या स्त्री ला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून सोनाराला दाखवून खात्री करून महिला कर्मचाऱ्या कडून झडती घेतली असता चोरलेले बेसर मिळून आल्या वरून तिचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, सदर च्या चोरटी ची पोलीस कोठडीची मागणी करून पोलीस अधिक तपास करणार आहे, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी करीत आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।