आचारसंहितेचा भंग केल्याने आमदार श्री बच्चू कडू यांचे विरुद्ध गुन्हा नोंदवा- गोपाल तिरमारे यांच मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
1481
Google search engine
Google search engine

अमरावती :-
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तहसील कार्यालयामार्फत आमदाराची राहुटी आपल्या गावात 2018 या अभियाना अंतर्गत दिनांक 1 जानेवारी 2018 ते 6 फेब्रुवारी 2018 चे दरम्यान गावागावात आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये किमान 1800 च्या वर पुरवठापत्रिका शिधापत्रिका तयार करून वितरीत करण्यात आल्या सदर वितरित करण्यात आलेल्या सर्वच पुरवठापत्रिका / शिधापत्रिका वर माननीय आमदार बच्चुभाऊ कडू आमदाराची राहुटी आपल्या गावात 2018 अशा आशयाचा शिक्का मारण्यात आला , अशाच प्रकारे गेल्या तीन ते चार वर्षापासून चांदूरबाजार अचलपूर तहसील अंतर्गत अंदाजे वीस हजार ते 35 हजार शिधापत्रिकेवर आमदार बच्चू कडू यांच्या नावाचा शिक्का बेकायदेशीररित्या मारण्यात आलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवसांमध्ये लाभार्थी हे ह्याच शिधापत्रिकेच्या आधारे शासकीय अन्नधान्याचा लाभ घेत आहेत व त्या शिधापत्रिकेवर आमदार बच्चू कडू यांच्या नावाचा शिक्का असल्याने आमदार बच्चू कडू यांच्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय अन्नधान्याचा लाभ मिळत असल्याची जाण शिधापत्रिकाधारकांना होत असून त्यांचा राजकीय फायदा बच्चू कडू यांना होत आहे व त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे असं श्री गोपाल तिरमारे यांनी म्हटले आहे

 

गोपाल तिरमारे यांनी दिलेलं निवेदन

 

आमदार श्री बच्चू कडू यांचा माफीनामा

 

त्यांनी महाराष्ट्र शासन यांच्याकडे तसेच माननीय विभागीय आयुक्त अमरावती, माननीय जिल्हाधिकारी अमरावती तथा तहसीलदार चांदूर बाजार यांच्याकडे जुलै 2018 पासून सदर बेकायदेशीरपणे शिधापत्रिकेवर बच्चू कडू यांच्या नावाचा शिक्का मारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदविणे बाबत तक्रार देऊन सतत पाठपुरावा करीत असून सुद्धा अद्याप पर्यंत कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही तसेच श्री बच्चू कडू यांनी सुद्धा प्रशासकीय अनियमितता झाली असे मान्य करून क्षमापित करणेबाबत दिनांक 30 /8 /2018 रोजी माननीय मंत्री नागरी पुरवठा महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना पत्र दिल्याने त्यांचेकडून प्रशासकीय अनियमितता झाल्याचे निष्पन्न होत आहे करिता आमदार बच्चू कडू यांनी शिधापत्रिकेत सारख्या शासकीय दस्तऐवजावर स्वतःला निवडणूक काळात राजकीय फायदा व्हावा या उद्देशाने बेकायदेशीरपणे शिक्का मारला, त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांनी केलेल्या कृत्याने निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याने त्यांचे विरुद्ध अशाप्रकारे कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच त्यांनी आपल्या विधानसभा सदस्य पदाचा गैरवापर करून अशा प्रकारे गैरकृत्य केले असल्याने त्यांची विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गोपाल तिरमारे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे …

Note – शिधापत्रिकेचा फोटो फक्त महितीस्तव टाकण्यात येत आहे