१७ मार्च रोजी “फाल्गुन के रंग बाबा के संग” भजन संध्याचे आयोजन

0
778
Google search engine
Google search engine

शेगांव:- श्री खाटू श्याम परिवार शेगाव चे आयोजन

शेगाव:- येथील श्री खाटू श्याम परिवारा शेगाव तर्फे रविवार १७ मार्च रोजी फाल्गुन के रंग बाबा के संग च्या अनुशंघाने शाम बाबा यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक श्री श्याम धाम अग्रसेन भवन परिसरामध्ये करण्यात आलेले आहे.

कलकत्ता येथील प्रख्यात भजन सम्राट विकास अग्रहरी व रीतिका खन्ना यांच्या मधुर आवाजात श्री श्याम धाम श्री अग्रसेन भवन परिसरातील भव्य मंडपात १७ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून या भजनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.

राजस्थान मधील खाटू धाम येथील श्याम बाबा यांचा शेगाव आणि परिसरात भक्त परिवार मोठ्या संख्येने राहतो खाटू श्याम परिवारातर्फे दरवर्षी विविध प्रख्यात भजन गायकांना आमंत्रित करून धार्मिक वातावरणामध्ये भजनाचा व अन्य श्याम बाबांच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या धार्मिक भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच रविवार १७ मार्चला सकाळी नऊ वाजता खाटू श्याम बाबांच्या धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण फाल्गुन शुल्क एकादशी या तिथी निमित्त श्री संत गजानन महाराज मंदिरातून ढोल-ताशांच्या गजरात खाटू नरेशच्या भक्ताच्या उपस्थितीमध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य अशी निशाण यात्रा काढण्यात येणार आहे श्रींच्या मंदिरातून प्रारंभ झालेली ही निशाण यात्रा आर डी १८ वरून म्हणजेच लहुजी वस्ताद चौक, संत गाडगेबाबा चौक, खेतान चौक, प्राचीन हनुमान मंदिराजवळून गांधी चौक मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि अग्रसेन चौक या मार्गावरून भजन किर्तन गात अग्रसेन भवन येथे पोहोचणार आहे या धार्मिक सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी शेगाव खाटू श्याम परिवाराच्यावतीने जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसत आहे कलकत्ता येथील प्रख्यात भजन गायकांच्या मधुर आवाजात भजन ऐकण्यासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी भव्य अश्या मंडपाची उभारणी करण्यात येणार असून अत्याधुनिक अशा साऊंड सिस्टिमची उभारणी कार्यक्रमाच्या स्थळावर करण्यात येणार आहे, याच प्रमाणे भजन ऐकण्यासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती खाटू श्याम परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे भाविकांनी रविवार १७ मार्च रोजी आयोजित या धार्मिक सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.