“शिवाजी महाराज व त्यांची युद्धपद्धती” या विषयावर व्याख्यान संपन्न _

0
912
Google search engine
Google search engine

शिवाजी महाविद्यालयात आयोजन

आकोट/ता.प्रतीनिधी
श्री शिवाजी महाविद्यालय अकोट येथे इतिहास विभागाद्वारे “शिवाजी महाराज व त्यांची युद्धपद्धती” या विषयावर दिनांक 11 मार्च रोजी प्रा. दिपराज माहोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते प्रा माहोरे हे जगदंब महाविद्यालय , अचलपूर येथे कार्यरत आहेत त्यांनी आपल्या व्याख्यानांमध्ये शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्याची आजच्या युवा पिढीमध्ये आवश्यकता याचे महत्त्व पटवून दिले. महाराजांनी जे अनेक विजय मिळविले ते मिळवीत असताना त्यांनी शक्तीबरोबरच युक्तीला महत्व कसे दिले हे त्यांनी पटवून दिले हे सांगताना त्यांनी महाराजांची गनिमी कावा युद्धपद्धतीचे सखोल विश्लेषण केले.याप्रसंगी कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. एस. एन .पाटोळे, वनस्पतिशास्त्र हे लाभले होते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर डॉ. प्रशांत कोठे. इतिहास विभाग प्रमुख उपस्थित होते. प्राध्यापक सचिन कोठेकर यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. ए. एल . कुलट यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाला भरपूर विद्यार्थी उपस्थित होते.