अभियंता आणि ठेकेदार वर कार्यवाही करा.विकास सोनार याचे निवेदन

0
1188
Google search engine
Google search engine

अभियंता आणि ठेकेदार वर कार्यवाही करा.
विकास सोनार याचे निवेदन

चांदुर बाजार:-/////

चांदूरबाजार बांधकाम विभाग येथे कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता निलेश चौधरी आणि शिरजगाव कासबा तसेच माधान ते ब्राह्मणवाडा थडी बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर घेतलेले संबंधित ठेकेदार त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना विकास सोनार यांनी निवेदन दिले आहेत.
माधान ते शिरजगाव कसबा रोडचे बांधकाम सुरू झाले असून या रोडमध्ये निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार विकास सोनार यांनी उपकार्यकारी अभियंता निलेश चौधरी यांच्याकडे केली होती मात्र संबंधित तक्रारीवर कोणतीही कारवाई न करता निलेश चौधरी हे संबंधित ठेकेदाराला पाठबळ देत असल्याने नव्याने बांधकाम सुरू असलेला माधान ते ब्राम्हणवाडा थडी रोड मध्ये सुद्धा ह्या हा ठेकेदार आपला मनमानीपणा करीत असल्याचे दिसत आहे त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार आपला मनमानीपणा करीत असल्याची तक्रार विकास सोनार यांनी मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे तसेच उपकार्यकारी अभियंता निलेश चौधरी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणार असल्याची भूमिका विकास सोनार यांनी घेतली असल्याने त्यांच्या या निवेदनाकडे संबंधित विभाग किती तातडीने लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी देऊरवादा बस स्टँड पासून दोनशे मीटरच्या अंतरामध्ये अनधिकृतपणे स्पीड ब्रेकर संबंधित ठेकेदाराने टाकले होते मात्र या संबंधित ठेकेदारावर उपकार्यकारी अभियंता यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे दिसून आले .त्यामुळेच विकास सोनार यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे समजत आहे. जोपर्यंत ठेकेदार आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर कार्यालय होणार नाही तोपर्यंत शांत बसणार सल्याची भूमिका विकास होणार यांनी स्पष्ट केली आहे त्यामुळे विभागाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदारावर काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यावेळी निवेदन देताना स्वप्नील घायर,गुड्डू लाडोळे, आणि नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया:-
शिरजगाव कसबा या रोड ते निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असल्याची तक्रार मी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती मात्र त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे संबंधित ठेकेदार बांधकाम मध्ये अधिक जास्त वाढला निकृष्ट पणाला संबंधित ठेकेदार दोघेपण जबाबदार असल्याने यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी याकरता मी वरिष्ठाकडे निवेदन दिले आहे कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मी माझ्या निवेदनात दिला आहे.
विकास सोनार:-