बाळापूर पोलिसांची अवैध धंद्या विरुद्ध धडक कारवाई

225

3 दिवसात 2 जुगार व 4 अवैध दारू विक्रीत्यांविरुद्ध कारवाईअकोला/ प्रतीनिधीआगामी लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून बाळापूर पोलिसांनी अवैध धंद्या विरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. पोलीस सुत्रांनुसार बाळापूर पोलीसांनी मागील तीन दिवसांत शहरात 2 जुगार वर कारवाई करून एकूण 5 आरोपींना ताब्यात घेतले व त्यांचे कडून एकूण 3275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच कोळसा, रिधोरा, व्याला, मनारखेड येथे अवैध हातभट्टी तसेच अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध धडक कार्यवाही करून एकूण 3आरोपींना ताब्यात घेऊन 4 गुन्हे दाखल केले, तर एक आरोपी फरार झाला , एकूण 15,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,सदर ची धडक मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख , पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, भालतीलक, पोलिस कॉन्स्टेबल राठोड, हर्षल श्रीवास ह्यांनी केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।