पदवी शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा : डॉ. एच. एम. कदम

आधुनिक काळामध्ये शिक्षणाला अतिशय महत्व आहे आणि शिक्षण प्रक्रियेमधील पदवी संपादन करणे हा एक महत्वाचा टप्पा असतो असे उदगार भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव येथील शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालय आयोजित पदवीदान समारंभामध्ये समारंभाचे प्रमुख पाहुणे भारती विद्यापीठचे सांगली विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी काढले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुलक्षणा कुलकर्णी अध्यक्ष स्थानी होत्या.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. एच. एम. कदम पुढे म्हणाले विध्यार्थ्यानी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेतले पाहिजे. पदवी पूर्ण होत असताना विध्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक विकासच पुरेसा नाही तर त्याचबरोबर सामाजिक आणि भावनिक विकास होणे ही महत्वाचे आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर विध्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये जबाबदारीची जाणीव होते आणि तो भविष्यातील विविध आव्हाने पेलण्यासाठी सक्षम बनतो. त्यानंतर त्यांनी पदवीप्राप्त विध्यार्थिनी चे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

समारंभाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुलक्षणा कुलकर्णी यांनी उपस्थित पदवीप्राप्त विध्यार्थिनीचे कौतुक केले. त्या आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या कि पदवीप्राप्त करणे हा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील परमोच्च क्षण आहे.समाज मनामध्ये आदरयुक्त भावना निर्माण करणारा क्षण आहे. पदवी प्राप्त झाल्यानंतर पदवीमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग हा त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये उपयोग करायचा असतो. पदवीनंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात. पदवी शिक्षणाचा कालावधी हा व्यक्तीला खूप शिकवून जातो. विध्यार्थीनिनी महाविद्यालयाने केलेले संस्कार स्मरणात ठेवून भविष्यात महाविद्यालयाशी संपर्कात राहावे. त्यानंतर त्यांनी पदवी प्राप्त विध्यार्थीनीचीस्तुती करून त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.

या कार्याकर्माचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालायाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. ए. बी. माळी यांनी केले. या कार्यकर्मासाठी विद्यापीठ अधिकार मंडळावरील प्रा. डॉ. यु. के. मोहिते, प्रा. डॉ.एस. वी. पोरे, प्रा. डॉ. सौ. एम. एम. घाटगे, प्रा. डॉ. गजानन माळी हे निमंत्रित व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यापीठाचा आणि महाविद्यालयाचा ध्वज यांची महाविद्यालयाच्यापरिसारात मिरवणुक काढण्यात आली. या पदवीदान समारंभासाठी १६ विध्यार्थिनी उपस्थित होत्या. तर महाविद्यालयातील विध्याथिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षेकेतर सेवक उपस्थित होते. या समारंभाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विकास साळुंखे यांनी केले तर सूत्रसंचालन कु. क्षितिजा पवार आणि कु. वैष्णवी इनामदार यांनी केले.