लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अधिकारी- कर्मचा-यांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई- जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल

139

अमरावती :-

निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असून, निवडणूक कार्याबाबत आदेश देऊनही अधिकारी- कर्मचारी हजर न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी नोडल अधिका-यांचीबैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, मनोहर कडू, विनोद शिरभाते, स्नेहल कनिचे, प्रियांका आंबेकर, अभिजित नाईक, अनिल टाकसाळे, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, आचारसंहिता नोडल अधिकारी संदीप जाधव, अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, निवडणूकीचे महत्वाचे कार्य व जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक अधिकारी व कर्मचा-याने काम करावे. कुणी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्यास तत्काळ नोटीस जारी करण्यात येईल. प्रत्येकाने आपली जबाबदारी जाणून काटेकोरपणे काम करावे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकांतून होणा-या मोठ्या रकमांचे व्यवहार किंवा इतर कुठलेही संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्याबाबत माहिती तत्काळ सादर करावी, त्याचप्रमाणे, बँकेचा प्रतिनिधी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात उपस्थित ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिले.
ते पुढे म्हणाले की, बॅलेट मतपत्रिकांबाबत कामकाजानिमित्त नियुक्त कर्मचा-यांची संख्या निश्चित करुन लगेच कार्यवाही व्हावी. जिल्हा नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत राहणार असून, तेथे पुरेसे मनुष्यबळ असावे. सभा, मिरवणूकी, फेरी, वाहन आदी परवानग्यांबाबत नियम व तरतूदी तपासूनच कार्यवाही करावी.

निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य, वाहने आदींबाबत संख्यानिश्चिती आजच व्हावी. निरीक्षकांना सादर करावयाची माहिती, दस्तावेज परिपूर्ण असावेत. मनुष्यबळासाठी आवश्यक प्रशिक्षण व तारखा निश्चित कराव्यात. कम्युनिकेशन नियोजनानुसार मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, बुथ लेव्हलपासून संपर्क ठेवावा. वाहनांना जीपीएस, आवश्यक तिथे सीसीटीव्ही आवश्यक यंत्रणा सुसज्ज ठेवावी. सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।