नरखेड तालुक्यात श्रमदान करून शाहिदांना श्रद्धांजली !  नागपूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले ४० गावांमध्ये श्रमदान !   नागपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम !  पानी फाउंडेशन च्या माध्यमातून गाव गावामध्ये उत्साहाचे वातावरण ! 

0
1825
Google search engine
Google search engine

नरखेड तालुक्यात श्रमदान करून शाहिदांना श्रद्धांजली !

नागपूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले ४० गावांमध्ये श्रमदान !

नागपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम !

पानी फाउंडेशन च्या माध्यमातून गाव गावामध्ये उत्साहाचे वातावरण !

विशेष प्रतिनिधी /

नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने नरखेड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी असलेली गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व ग्राम सेवक संघटना यांनी शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्याकरिता एक अभिनव उपक्रम राबवून श्रमदानाच्या माध्यमातून शाहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली , नरखेड तालुक्यात दुष्काळाने ग्रासलेल्या गावकऱ्यांनी पाण्याचं महत्व पटवत वॉटर कप स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त पणे सहभाग घेतल्याचं चित्र आपणास पाहायला मिळत आहे. वाढत चाललेली दुष्काळाची दाहकता ओळखून नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील असणाऱ्या गावातील लोकांनी आता गाव पाणीदार करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. गावकऱ्यांचा हा उत्साह कायम ठेवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हि त्याला हातभार लावला आहे. आलिशान इमरतीत बसून केवळ कागदी घोडे नाचवणारे अनेक अधिकारी आपण पाहिले असतील. मात्र ऑफिसच्या बाहेर पडून घामगळेपर्यंत काम करुण, जनतेच्या हातात हात घालून, लोकांच्या खांद्याला खांदा लाउन काम करणारे अधिकारी नरखेड तालुक्यात पहायला मिळाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या प्रेरणेतून नागपूर जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी नरखेड तालुक्यातील ४० गावांमध्ये श्रमदान करून पाणी फाउंडेशनच्या श्रमदान शिबिरात सहभाग घेत, जनतेसमोर नविन्यापूर्ण आदर्श ठेवत गावकऱ्यांचा उत्साह हि वाढवला आहे.

सध्या नरखेड तालुक्यात पाण्यासाठी घमासान, अशी भीषण स्थिती आहे. नरखेड तालुक्यातील गावांनी सत्यमेव जयते ‘वॉटर कप स्पर्धे’त भाग घेऊन श्रमदान सुरू केले आहे. गावकरी गावासाठी झटत आहेत. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘प्रत्येक गावामध्ये अधिकारी कर्मचारी ‘ येत आहेत. पाण्यासाठी परिस्थितीशी झुंजणाऱ्या गावकाऱ्यांसोबत आपणही श्रमदान केले पाहिजे, या विचारातून नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी नरखेड तालुक्यातील ४० गावांमध्ये रवीवारी सकाळी साडेसहा वाजता पोहोचले. दिवसभरात त्यांनी गावकाऱ्यांसोबत श्रमदान केले. विशेष म्हणजे, येथे दररोज श्रमदान करणाऱ्या गावकरी व विद्यार्थ्यांसोबत अधिकारी कर्मचाऱ्यांनी शोष खड्डे , वृक्ष लागवडीसाठी शेकडो खड्डे तयार करून श्रमदान केले .

जलसंवर्धनाच्या कामाचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या गावातील तरुणांच्या मार्गदर्शनात श्रमदान करण्यात आले. गावालगतच्या टेकडीवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करण्यात आले. अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले. दिवसभर चाललेल्या या श्रमातून नरखेड तालुक्यातील ४० गावांमध्ये शेकडो शोषखड्डे तयार करण्यात आले व गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले .

यावेळी प्रत्येक गावाला भेट देऊन मार्गदर्शन करण्याचे काम गट विकास अधिकारी दयाराम राठोड , कामठी पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी , सहाय्यक गट विकास अधिकारी चेतन हिवंज , विस्तार अधिकारी नेहारे , गुंजरकर , पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , पाणी फाउंडेशन टीम व नरखेड पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केले यावेळी प्रत्येक गावातील सरपंच उप सरपंच ग्राम सेवक व शेकडो गावकरी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते हे विशेष .