टेंभुर्णी येथील कुऱ्हाडने मारहाण केल्याच्या प्रकरणातुन तीन आरोपींची निर्दोष मुक्तता – अधीवक्ता अहेफाज राराणी यांचा यशस्वी युक्तीवाद

0
674
चांदूर रेल्वे – (शाहेजाद खान ) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी येथील एका भांडणाच्या प्रकरणात कुऱ्हाडीने मारहाण केल्याच्या प्रकरणातुन तीन आरोपींची चांदूर रेल्वे येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असुन यासाठी आरोपी पक्षातर्फे अधीवक्ता. अहेफाज राराणी यांनी यशस्वी युक्तीवाद केला.
सविस्तर माहितीनुसार, २७ जुन २०१५ रोजी फिर्यादी श्रीराम जिवतोडे हे त्यांच्या टेंभुर्णी येथील शेतात असतांना गावातीलच आरोपी भुषण जिवतोडे, वासुदेव जिवतोडे व एका महिला हे तिघे फिर्यादीच्या शेतातुन बैलबंडी नेत होते. फिर्यादीने आरोपींची बैलबंडी अडवली असता तिन्ही आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून कुऱ्हाडीने मारल्याचे तक्रारीत नमुद केले होते. सदर फिर्यादीच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरूध्द भा.द.वि. कलम ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरण चांदूर रेल्वे येथील फौजदारी न्या. एस. सी. खैरनार यांच्या न्यायालयात सुरू असतांना सरकारतर्फे एकुण ९ साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. यानंतर न्या. एस. सी. खैरनार यांनी तिन्ही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. फिर्यादीतर्फे सरकारी वकिल श्री. जुनघरे यांनी काम पाहिले. तर आरोपींतर्फे अधीवक्ता अहेफाज राराणी यांनी अभ्यासपुर्ण यशस्वी युक्तीवाद करून आरोपींना निर्दोष मुक्त केले.