तलवारीने व फायटरने झालेल्या  हाणामारीत सरपंचपती गंभीर

0
1755
Google search engine
Google search engine

तलवारीने व फायटरने झालेल्या हाणामारीत सरपंचपती गंभीर

उस्मानाबाद / प्रतिनीधी काक्रंबा येथील अनिल बंडगर यांना बेदम मारहाण केल्याची घटना तुळजापूर ते काकरंबा रस्त्यावर घडली या मारहाणीत तलवार व फायटरचा वापर केला.काँग्रेसच्या कार्यकरत्यांनी व इतर दहा ते पंधरा जणानी बेदम मारहाण केली आहे हि घटना २० मार्च रोजी दुपारी ४ वाजून ४५ मिनीटाला घडल्याचे समजते. याबाबत अधीक माहीती अशी कि तुळजापूर तालुक्यातील काकरंबा येथील वर्षा बंडगर या सरपंच आहेत .काकरंबा व परिसरात येथीलच काँग्रेसच्या कार्यकरत्यांनी पाणलोट क्षेत्राचे काम केले होते.त्या कामाची एकूण रक्कम २२ लाख रुपये होती.त्या बिलाच्या कारणावरून सरपंचाचे पती आनिल बंडगर हे तुळजापूरहून काकरंबा येथे मोटारसायकलवर जात असताना त्यांना रसत्यात आडवून बिल काढून दे म्हणुन दहा ते पँधरा जणांनी शिवीघाळ करायला सुरवात केली.व त्यांच्यावर एक जणाने तलवारीने डोक्यात वार केले.व दुसर्या एकाने फायटरने पोटात मारहाण केली व इतर लोकांनी लाथाबुक्यानी मारहाण केल्याचे समजते.या घटनेत अनिल बंडगर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उस्मानाबाद येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून पुढिल कार्यवाही सुरु आहे.