कडेगांव पलुस विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी दि.२५रोजी सा.५वा.मा.नामदार. चंद्रकांतदादा पाटील याच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे :भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख

कडेगाव := सांगली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मा. संजयकाका पाटील यांचे प्रचारार्थ पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक सोमवार दि. 25 रोजी सायं. 5.00 वा साईमंगल कार्यालय वांगी ता. कडेगांव येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.
लोकसभा निवडणुक प्रचार नियोजन व शुभारंभ यासंबंधी चर्चा होणार असून यावेळी ना. चंद्रकांत दादा पाटील, संजयकाका पाटील. शहर जिल्हाध्यक्ष आ. सुधीर दादा गाडगीळ, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश भाऊ खाडे, शिवसेनेचे आ. अनिलराव बाबर, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सांगलीच्या महापौर संगीता खोत हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी शिवसेना व मित्रपक्षांचे अध्यक्ष व पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, मंडल पदाधिकारी मोर्चा व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असै आवाहन श्री देशमुख यांनी केले.
====