अनेक राज्यात थेमान घातलेला अट्टल गुन्हेगार अब्बास शेकू परळी पोलिसांच्या ताब्यात

0
1014
Google search engine
Google search engine

 

परळी वैजनाथ: नितीन ढाकणे

दि.24 – विविध राज्यांमध्ये अनेक गुन्ह्यातील सराईत आरोपीला आज संभाजीनगर पोलीस ठाण्याने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. फरारी आरोपी शोध मोहीम सुरु असतांना ही कारवाई केली गेली.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली.
चोरी फसवेगिरी, चैनसन्याचिंग असे अनेक गुन्हे आरोपीवर आहेत.

जहिर अब्बास शेकू रा.इराणी गल्ली ,व त्याच्या सोबत त्याचा साथीदार लल्ला शेकू, असे त्या कुख्यात आरोपीचे नाव असून महाराष्ट्र, गुजरात,आंध्रप्रदेश,कर्नाटक या राज्यात त्याच्यावर असंख्य गुन्हे दाखल आहेत.आज दुपारी गुप्त माहितीच्या आधारे इराणी गल्लीत कॉम्बिग ऑपरेशन करत पोलिसांनी ही कारवाई केली.त्याच्याकडून आणखी बऱ्याच गुन्ह्याची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक बलासाहेब पवार,स.पो.नि. सलीम पठाण,स.पो.नि. श्रीकांत डोंगरे,डी.बी.इंचार्ज रमेश सिरसाट,पो.ना. दत्तात्रय गित्ते,बडे, निर्मळ,भताने, राठोड,फड,आडेकर होमगार्ड मुंडे,भांगे यांच्यासह आरसीपी जवान यांनी केली.