केजरीवाल यांच्या विरोधात हिंदूंचे धार्मिक चिन्ह स्वस्तिकचा अवमान केल्यावरून गुन्हा नोंद

0
818
Google search engine
Google search engine

नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हिंदूंचे पवित्र धार्मिक चिन्ह स्वस्तिकचा अवमान करणारे एक व्यंगचित्र पोस्ट केेले होते. या व्यंगचित्रामध्ये हातात झाडू घेतलेला माणूस स्वस्तिकच्या मागे धावतांना दिसत आहे. झाडू हे आपचे चिन्ह आहे. यावरून आपवाले स्वस्तिक म्हणजे हिंदुत्वनिष्ठ भाजपच्या मागे लागले आहेत, असे या व्यंगचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या व्यंगचित्राच्या खाली केजरीवाल यांनी ‘हे कोणीतरी पाठवले आहे’ असे लिहिले होते.

सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांनी देहलीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्याकडे याविषयी तक्रार केली होती. त्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला.

 

सूचना – संबंधित फोटो फक्त माहितीस्तव टाकला आहे ……