५७ कामगार पाल्यांना शैक्षणिक पुस्तक खरेदीसाठी ८१ हजार रुपये मंजूर

120

परळी कामगार कल्याण केंद्राचा उपक्रम

कामगार पाल्यांना मोठा दिलासा

परळी (प्रतिनिधी) : येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या ५८ कामगारांच्या पाल्यांना पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेतंर्गत शैक्षणिक पुस्तके खरेदीसाठी ८१ हजार ९० रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले. यामुळे गरीब कामगार पाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कामगार कल्याण केंद्रातर्फे दरवर्षी पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या मुलांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते.
यात बारावी कला, वाणिज्य, विज्ञान, पदवी, पदव्युत्तर, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले.
यामध्ये बारावीच्या १७ विद्यार्थ्यांना ६ हजार ४०१ रुपये, पदवीच्या १५ विद्यार्थ्यांना २० हजार ८२ रुपये, पदव्युत्तर पदवीच्या ३ विद्यार्थ्यांना ४ हजार ५०० रुपये, पॉलिटेक्निकच्या ४ विद्यार्थ्यांना ८ हजार २ रुपये, अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांना २९ हजार ७१० रुपये, एमबीबीएस व बीएचएमएसच्या ५ विद्यार्थ्यांना १२ हजार ३९५ रुपये अर्थसहाय्य देण्यात आले.
एस.टी. महामंडळ, साखर कारखाने, ऑइल मिल, बँका, वीज कंपनी, खाजगी कंपन्या आदी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना पाठ्यपुस्तक खरेदीसाठी ही मदत करण्यात आली आहे.
लाभार्थी कामगार पाल्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर मंजूर रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच कामगार कल्याण केंद्रातर्फे कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, क्रीडा शिष्यवृत्ती योजना, परदेशी शिष्यवृत्ती योजना, संगणक शिक्षणासाठी अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्र संचालक आरेफ शेख यांनी केली आहे.

विविध उपक्रम

कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. महिलांसाठी शिवण वर्ग, नाट्य व भजन स्पर्धा, विविध प्रशिक्षण शिबिरे, कामगार कवी संमेलन, महिला व मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।