प्रथमच बीड जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय तेली समाजाचा वधु-वर परिचय मेळावा संपन्न

0
1808
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी बीड: परळी वैजनाथ (नितीन ढाकणे )

श्री शनैश्वर प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

दि 7 एप्रिल २०१९ रोजी प्रथमच बीड जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय तेली समाजाचा वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आले. शहरातील हलगे गार्डन येथे शनेश्वर प्रतिष्ठान तर्फे सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत मेळावा घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना.पंकजा मुंडे ,बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे ना.धनंजय मुंडे परळीच्या नगराध्यक्षा सरोजनी हलगे, कलमनुरीचे नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे ,लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी अमदपुरच्या नगराध्यक्षा अश्विनी घासणारे, जालन्याचे उद्योजक मनोहर शिंनगारे प्रेमनाथ फकिरे, व पोपटराव गवळी नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे आदी उपस्थित होते.

एकाच व्यासपीठावर अनेक ऊप वधू-वरांची  माहिती उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी स्वागताध्यक्ष वैजनाथ बेंडे, बाळासाहेब राजमाने, मेळावा समितीचे कार्याध्यक्ष मधुकर शिंदे आदींनी उपस्थितांचे स्वागत व मनोगत व्यक्त केले,

मेळावा समिती चे सचिव प्राध्यापक प्रवीण फुटके यांनी प्रास्ताविक केले चंद्रशेखर फडके सुजाता फडके प्राध्यापक उमाशंकर साखरे प्राध्यापक सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले उत्तम साखरे यांनी आभार मानले कार्यक्रमास राज्यभरातून साडेतीन हजार समाज बांधवांनी उपस्थिती लावली मेळाव्यासाठी परळीतील समाजबांधवांनी उत्कृष्ट नियोजन केले होते सकाळी नाश्ता दुपारी एक ते चार भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये समाजाचे परिचय आणि विवाह मेळावे घेणे ही काळाची गरज आहे. आपल्यातील सर्व शाखा एकत्रित करून आपल्या समाजाचे कार्य आपणासच करावे लागेल , याची जाणीव प्रत्येक समाज बंधनि  घ्यावी लागेल तरच हा समाजरुपी संतांजीचा  रथ चालू राहील. असे मत मेळाव्याचे कार्याध्यक्ष मधुकर शिंदे यांनी केले.