पाच वर्षात जिल्हयातील रस्त्यावरचे खड्डे बुजविले, पुढील पांच वर्षात तुमच्या भाग्यावरचे खड्डे मिटविल्याशिवाय राहणार नाही

0
918

 

*चिंचोली माळीच्या सभेत ना. पंकजाताई मुंडे यांनी जिंकली मतदारांची मने*

बीड दि. ०९ —–तुमचे आशीर्वाद, तुमची शक्ती, तुमचे प्रेम हीच माझी संपत्ती आहे. ते किंचित कमी होऊ देऊ नका.अजून पाच वर्षे मला द्या..या पाच वर्षांमध्ये मी जिल्हयातील रस्त्यावरचे खड्डे मिटवले,पुढच्या पाच वर्षात तुमच्या भाग्यावरचे खड्डे मिटवल्या शिवाय मी राहणार नाही अशी भावनिक साद घालत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित मतदारांची मनं जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेस ही आता फक्त भ्रष्टवादी राहिली नसून बुद्धी भ्रष्टवादी पार्टी झाली आहे अशा शब्दांत त्यांनी जोरदार हल्ला चढवला.

भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ चिंचोली माळी ता. केज येथे आयोजित प्रचंड जाहीर सभेत त्या बोलत होत्या. आ. संगीता ठोंबरे, ज्येष्ठ नेते रमेश आडसकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, डाॅ. भागवत कराड, सुनील गलांडे, संतोष हंगे, अॅड. दिलीप करपे, योगिनी थोरात, संदीप पाटील, विजयकांत मुंडे, रत्नाकर शिंदे, पंजाब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

मतदारांशी संवाद साधतांना ना. पंकजाताई मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या की, जिल्ह्यातील गावागावात निधी देतांना मी जात पाहिली नाही, सर्वांना भरभरून निधी दिला. जिल्हयात झालेली विकासकामे आणि त्यासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी सुद्धा सांगताना वेळ पुरत नाही. जिल्ह्याची मागासले पणाची ओळख पुसून विकसनशील जिल्हा झाला असतानाही भ्रष्टाचारी म्हूणून ओळख झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तथाकथित नेत्यांना जर झालेला विकास दिसत नसेल तर ही नुसती भ्रष्टवादी पार्टी राहिली नसून बुद्धीभ्रष्ट असणारी पार्टी झाली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

जिल्ह्यातील लोकांनी मुंडे साहेबांवर अपार प्रेम केले तेच आज माझ्यावर करत आहात ही आमच्यासाठी फार मोठी पुण्याई आहे तिला कसल्याच किमतीत मोजता येणार नाही.आज प्रितमताई निवडणूक लढवत आहेत त्यांच्या पाठीशी आपले प्रेम आणि आशीर्वाद आहेत. कारण प्रितमताई यांनी केलेले काम तुमच्या समोर आहे. विरोधकांनी मात्र सत्तेच्या काळात जिल्हा परिषद लुटून खाल्ली, शिक्षकांच्या बदल्या करून भ्रष्टाचार केला त्यामुळे आता जनतेसमोर सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नसल्याने जाती-पातीच विष पेरण्याचे उद्योग यांनी सुरू केले आहेत परंतु या विषारी प्रचाराला आणि प्रचार करणारांना माय-बाप जनता भीक घालणार नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

*मराठा आरक्षणासाठी सर्वात पुढे*
—————————-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी लोकनेते मुंडे साहेबांची पुर्वीपासून भूमिका होती. या समाजाचे नेतेच फक्त श्रीमंत झाले, समाजातील लोकांकडे त्यांचे कधीच लक्ष गेले नाही. कांग्रेस-राष्ट्रवादीने समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकले नाही पण आमच्या सरकारने दिलेले आरक्षण कोर्टात टिकले आणि या समाजाचा प्रश्न सुटला. हा प्रश्न सोडविण्यासाठी मी सर्वात पुढे राहिले. ओबीसी ला धक्का न लावता हे आरक्षण आम्ही दिले असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हयाचा विकास माझ्यासाठी प्रथम आहे, तीर्थक्षेत्राचा विकास करताना देखील भेदभाव केला नाही, सर्व गडांचा समान विकास केला असे त्या म्हणाल्या. प्रितमताई मुंडे यांच्या नावावर आक्षेप घेणा-या विरोधकांचा त्यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला. मुलीने वडिलांचे नांव लावायचे नाही का? वडिल ऊसतोड कामगार असते तरी तेच नांव लावले असते असे त्या म्हणाल्या.

*जनता राष्ट्रवादीला जागा दाखवेल*
——————————–
सत्तेच्या काळात कोणतीही योजना असेल, आलेला निधी असेल हा समाजातील सर्वात शेवटच्या वर्गापर्यंत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच ब्रिटिशांनी ज्या प्रमाणे समाजात भांडणे लावून स्वतःचा स्वार्थ साधण्याचे काम केले त्या प्रमाणे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप यांनी नेहमीच केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ब्रिटिशांची औलाद असून जनता याना यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असे त्या म्हणाल्या.

*वडवणी तालुक्यात झंझावात*
——————————–
ना. पंकजाताई मुंडे हया आज वडवणी मार्गे नेकनूरकडे जात होत्या. नियोजित दौरा नसतानाही वडवणी, कोठरबन, चिखल बीड, जिवाची वाडी, येवता आदी गावांतील मतदारांनी त्यांना थांबवून घेतले व त्यांचे जंगी स्वागत केले. गावोगावी मतदारांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. अचानक येवूनही बैठकांचे रूपांतर जाहीर सभेत झाले. जिवाची वाडी या गांवाला गेल्या साठ वर्षांपासून रस्ता नव्हता तो रस्ता ना. पंकजाताई मुंडे यांनी करून दिला त्यामुळे भारावलेल्या ग्रामस्थांनी प्रितमताई मुंडे यांनाच भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी केला.
••••