मतदान केल्यानंतर परतणाऱ्या मतदारांचा ट्रॅक्टरचा भीषण अपघात 3 ठार – 9 गंभीर

0
1470
Google search engine
Google search engine

(वडसा)देसाईगंज : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान करून परतणाऱ्या मतदारांवर काळाने झडप घातली आहे. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून परत येताना डोंगर मेंढा गावानजीक ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाला . या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हिरा राऊत (७०), यमुना मलकाम (६०) , रसिक मरस्कोल्हे (६०) अशी मृतकांची नावे आहेत.
आज दुपारी १ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला असून ट्रॅक्टर चालक नशेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलिवण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरमधून 10 ते 12 जणांना शंकरपूर मतदान केंद्रावर नेण्यात येत होतं.