चांदूर रेल्वेत आचार संहितेचा भंग – थोर पुरूषांच्या अभिवादन फ्लॅक्सवर राजकिय नेत्याचा फोटो टाकला

526

चांदूर रेल्वे / शहेजाद खान – 
०६ वर्धा लोकसभा निवडणूकीसाठी आज (ता.११) प्रत्यक्ष मतदान पार पडले. मात्र
काल रात्री चांदूर रेल्वेत येथील एका बहुउद्देशीय संस्थेने थोर पुरूषांना जयंती निमित्त
अभिवादन करणारी फ्लॅक्स बॅनर शहरात लावले. त्यामध्ये स्थानिक आमदाराचा फोटो
टाकल्याने आचार संहितेचा भंग झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

भारतीय निवडणूक आयोगाने २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श
आचार संहिता लागू केली. आदर्श आचार संहिता लागू होताच धामणगाव रेल्वे विधान
सभाक्षेत्रातील चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यासह शहरातील
राजकीय पक्षाचे फ्लॅक्स, बॅनर, पोस्टर व भूमिपूजन कामाचे बोर्ड  झाकून टाकण्यात आले
होते. लोकसभा निवडणूक काळात एप्रिल महिण्यात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,
श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती येत आहे. अशावेळी नागरिकांना थोर पुरूषांना
व देवतांना अभिवादन करणारे बॅनर, फ्लॅक्स, पोस्टर लावता येते. एकमेकांना शुभेच्छाही देता
येतात. मात्र त्यामध्ये कोणत्याही राजकिय पक्षाचा, नेत्यांचा उल्लेख करता येत नाही. तसे
करायचे असेल तर निवडणूक विभागाची रितसर परवानगी घ्यावी लागते. असे असतांना
चांदूर रेल्वे येथील सुयश बहुउद्देशीय संस्था, चांदूर रेल्वे यांनी स्थानिक जुना मोटर स्टॅड चौक
व पोलीस स्टेशन समोर महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना
विनम्र अभिवादन करणारे फ्लॅक्स बॅनर लावले. त्या फ्लॅक्सची त्यांनी रितसर परवानगी
चांदूर रेल्वे नगर परिषदकडून घेतली. परवानगी पत्रात सुयश बहुउद्देशीय संस्थेने थोर पुरूषांना
जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी फ्लॅक्स लावत असल्याचा उल्लेख केला, मात्र कोणत्या
राजकिय पक्षाच्या नेत्यांच्या फोटो टाकत असल्याचे नामोल्लेख टाळला. या फ्लक्स बॅनर
करीता त्यांनी स्थानिक निवडणूक विभागाची रितसर परवानगी मात्र घेतली नाही. त्यामूळे या
प्रकरणी निवडणूक विभाग या संस्थेवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुयश बहुउद्देशिय संस्थेला नोटीस बजावणार-एसडीओ नाईक

आदर्श आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी स्थानिक सुयश बहुउद्देशिय संस्थेला नोटीस बजावण्यात येणार असून त्या प्रकरणाचा तपास करून कारवाई करणार तसेच त्यांनी लावलेल्या फ्लॅक्स बॅनरवरील त्या राजकिय नेत्याचा फोटो झावूâन टाकण्याचे आदेश दिले असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ अभिजीत नाईक यांनी सांगीतले.

सूचना – सदर फोटो फक्त माहितीस्तव टाकण्यात येत 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।