ममता बॅनर्जी यांच्या सरकारला २० लाख रुपयांचा दंड – राजकारणावर टीका असणार्‍या चित्रपटाचे प्रदर्शन रोखल्याचे प्रकरण

142

नवी देहली – बंगाली चित्रपट ‘भोविष्योतेर भूत’चे प्रदर्शन रोखल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारला २० लाख रुपयांचा दंड ठोठावला. या चित्रपटाचे निर्माते आणि चित्रपटगृहांचे मालक यांना हे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यावरून हा दंड ठोठावण्यात आला. ‘भोविष्योतेर भूत’ या चित्रपटातून राजकारणावर व्यंगात्मक टीका करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी तो रोखण्यात आला. ‘यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहांच्या मालकांवर दबाव आणला होता’, असा आरोप या चित्रपटाच्या निर्मार्त्यांनी केला होता.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।