शिवसंग्रामला परळीत धक्का, एकमेव सरपंचही कार्यकर्त्यांसह भाजपात

236

ना. पंकजाताई मुंडे यांनी केले स्वागत, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार

प्रतिनिधी- दिपक गित्ते

परळी वै दि.12 – आ. विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला परळी तालुक्यात मोठ्ठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाचा एकमेव सरपंच धुराजी साबळे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल झाले आहेत. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मिरवटमधुन सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आ. विनायक मेटे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने परळी तालुक्यातील मिरवट येथील सरपंच धुराजी साबळे हे नाराज झाले. ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे वैभव होते असे सांगत त्यांना मोठे करणार्‍यांनाच धोका देत असतील कार्यकर्त्यांचे काय असा सवाल करून ना. पंकजाताई यांच्यासोबत राहिल्यानेच गावचा विकास होणार आहे. त्या सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणार्‍या नेत्या असल्याने आपण भाजपात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मिरवट व परिसरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही सरपंच साबळे यांनी दिली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, युवानेते राजेश गीते यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।