विनापरवानगी सोशल मीडियावर राजकीय जाहिरात प्रसारणाबद्दल तक्रार

Google search engine
Google search engine

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत सोशल मीडियावर विनापरवानगी राजकीय जाहिरात प्रसारित केल्याबद्दल कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) चे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमातील राजकीय जाहिरातींच्या प्रसारणासाठी माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 44 सांगली लोकसभा मतदार संघातील नामनिर्देशन पत्र वैध ठरलेले संजय रामचंद्र पाटील यांच्याशी संदर्भात माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे पूर्वप्रमाणन केलेली प्रचारसदृश्य जाहिरात संजयकाका व्हॉटस् ऍ़प स्टेटस साँग या नावाने ऋषिकेश चव्हाण – पाटील या व्यक्तिने युट्युबवर अपलोड केल्याचे निदर्शनास आले.याबाबत संजय रामचंद्र पाटील यांच्याकडे एमसीएमसीने खुलासा मागितला असता, सदरचे संजयकाका व्हॉटस् ऍ़प स्टेटस साँग आपल्या फॉर्म नं. 26 मधील सोशल मीडिया अकाऊंट वरून अपलोड केलेले नाही अगर कोणासही तसे करण्यास सांगितले नाही, असा खुलासा त्यांनी सादर केला. त्यामुळे समितीच्या निर्णयानुसार समिती सदस्य सचिव वर्षा पाटोळे यांनी ऋषिकेश चव्हाण – पाटील यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस स्थानकात भारतीय दंड संहितेच्या कलम 188/171 (एच) अन्वये कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.00000