उन्हाच्या तडाख्याने मतदानाच्या टक्केवारीत घसरण – वर्धा लोकसभेमध्ये ६१.१८ टक्के मतदान

154
मतदानाची टक्केवारी घसरल्याने भल्याभल्यांच्या चुकला काळजाचा ठोका
‘बिएलओ‘च्या चिठ्ठ्या मतदारांपर्यंत पोहचल्या नसल्याने मतदारामध्ये प्रचंड गोंधड
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
गुरूवारी वर्धा लोकसभा मतदार संघाचे मतदान पार पडले. मात्र यंदा सुर्य आग ओकत असल्यामुळे याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडला आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात केवळ ६१.१८ टक्के मतदान झाले. तसेच धामणगाव रेल्वे सह इतर काही विधानसभा मतदार संघात ‘बिएलओ‘च्या चिठ्ठ्या मतदारांपर्यंत पोहचल्या नसल्याने मतदारामध्ये प्रचंड गोंधड उडाला होता. त्यामूळे कोणत्या मतदान केंद्रावर मतदान आहे हे पाहण्यासाठी मतदार भटकत असतांनाचे चित्र सर्व मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. यामुळे सुध्दा मतदानाच्या टक्केवारीवर फरक पडल्याचे मत काहींनी व्यक्त केले.
सकाळीच मतदानासाठी झालेली मतदारांची गर्दी, दुपारी कडक उन्हामुळे ओस पडलेले मतदान केंद्र, सायंकाळी पुन्हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चाललेली घाई, असे चित्र सर्व मतदारसंघाच्या ग्रामीण भागात होते. मतदानास सुरुवात झाल्यानंतर अकरा – बारा वाजेपर्यंत मतदारांमध्ये ऊत्साह दिसत होता. त्यानंतर मतदान केंद्रांवर शुकशुकाट जाणवत होता. उन्हाचा तडाखा तीव्र झाल्याने मतदार घराबाहेर न पडल्याने पुन्हा दुपारी एक ते तीन, चार वाजेदरम्यान मतदान रोडावले. यानंतर चार वाजतानंतर काही मतदान केंद्रावर रांगा पहावयास मिळाल्या. वर्धा लोकसभेत एकुण ८९३१४१ पुरूष मतदारांपैकी ५७२३६७ व ८४८७४१ महिला मतदारांपैकी ४९३४०५ व इतर ६ असे एकुण १०६५७७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या संपुर्ण लोकसभा संघातील मतदानाची टक्केवारी ६१.१८ आहे. पुरूषांची लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ६४.०८ असुन महिलांची ५८.१३ व इतरांची ३३.३३ टक्के आहे. मतदानाची टक्केवारी घसरल्याने भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून विजयाचे गणित बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
६ विधानसभा क्षेत्रातील टक्केवारी 
धामणगाव विधानसभा मतदार संघात १५८५८१ पुरूष मतदारांपैकी १०२१०९ व १५३०२९ महिला मतदारांपैकी ८८८५० असे एकुण १९०९५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ६१.२८ आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघात १४८५८७ पुरूष मतदारांपैकी ९७८५८ व १३९००० महिला मतदारांपैकी ८१९४५ असे एकुण १७९८०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ६२.५२ आहे.
आर्वी विधानसभा मतदार संघात १३३१३५ पुरूष मतदारांपैकी ९०१४७ व १२७१८८ महिला मतदारांपैकी ७७८९६ असे एकुण १६८०४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ६४.५५ आहे.
देवळी विधानसभा मतदार संघात १४०८१४ पुरूष मतदारांपैकी ९१९८९ व १३१४५६ महिला मतदारांपैकी ७९२९९ असे एकुण १७१२८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ६२.९१ आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात १५२९५७ पुरूष मतदारांपैकी १००९६६ व १४३०१८ महिला मतदारांपैकी ८६५९१ असे एकुण १८७५५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ६३.३७ आहे.
वर्धा विधानसभा मतदार संघात १५९०६७ पुरूष मतदारांपैकी ८९२९८ व १५५०५० महिला मतदारांपैकी ७८८२४ व इतर ६ असे एकुण १६८१२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ५३.५२ आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।