संतनगरित रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी

213

श्रीरामाच्या गजराने दुमदुमली संतनगरी

शेगांव:- आज भगवान रामचंद्रांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी खऱ्या अर्थाने रामचंद्र हे महापुरुष होते श्री रामरायाच्या अंगी प्रत्येक सद्गुण होता उत्कृष्ट प्रजापालन करणारा राजा, कर्मयोगी आणि उत्कृष्ट योद्धा ,संकटाला न घाबरणारा युगपुरुष ,राजारामचंद्रांची श्रीरामनवमी संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये असलेले हिंदू व्यतिरिक्त इतरही समाजातील लोक आनंदाने आणि उत्साहाने मनवतात. विदर्भाची पंढरी म्हणून गणल्या जाणारी शेगाव नगरी येथे गजानन महाराज मंदिरात रामनवमी हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभरातून गजानन महाराज मंदिरात भाविक दिंड्या घेऊन येतात, त्यामुळे येथे पंढरपूर सारखे स्वरूप प्राप्त होते जवळ जवळ पंधराशे ते सोळाशे भजनी दिंड्यांचे आगमन शेगाव येथे झालेले आहे. श्रीरामनवमी उत्सवा निमित्त आज दुपारी संतनगरीतून गण गण गणात बोते, श्रीराम जय राम जय जय राम च्या गजरात श्रींचा भव्य पालखी सोहळा राजवैभवी थाटात निघाला . श्रीरामनवमी निमित्त शहरात भाविकांची गर्दी झाली असून गेल्या चार-पाच दिवसापासून राज्यभरातून शेकडो भाविकांचे आवागमन झाले आहे. श्री ग. म. संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे मार्गदर्शन व कार्यकारी विश्वस्त निलकंठदादा पाटील यांचे देखरेखीखाली सेवधारी श्रींभक्तांना सर्वोतोपरी सेवा देत आहेत भाविकांची गर्दी पाहून श्रींचे मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिरात दर्शनासाठी जाणे व बाहेर येण्यासाठी ऐकेरी मार्ग करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दर्शनास आलेल्या ‘श्री’ भक्तांना मंदिरमध्ये सकाळी ९ ते रात्री १०वा. पर्यंत दररोज महाप्रसादाचे वितरणही सुरु आहे. ०६ एप्रिल पासून श्री गजानन महाराज संस्थान मध्ये श्रीराम नवमी उत्सवाला विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात झालेली आहे. आज १३ एप्रिल रोजी सकाळी १० वा.श्री ग. म. संस्थानच्या विश्वस्तांचे प्रमुख उपस्थितीत यागाची पूर्णाहुती व अवभृत्स्नान होवुन १० ते १२ दरम्यान ह.भ.प.श्रीराम बुवा ठाकूर परभणी यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन पार पडले. दुपारी २ वा.मंदिरातून श्री च्या पालखीची रथ,मेणा, गज अश्वासह राजवैभवी थाटात नगर परिक्रमा प्रारंभ झाली. या प्रसंगी श्री ग. म. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांचे हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करण्यात आले नगर परिक्रमा पूर्ण झाल्यावर संध्याकाळी मंदिरात परत पालखीचे आगमन होईल आणि आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवाची सांगता होणार आहे.
नांदुराच्या ढोलपथकाने पालखीत सहभाग घेतला

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।